बुद्धिमान व तेजस्वी राष्ट्राच्या घडणीसाठी आयोडिनविषयी जागरूकतेला नवी गती
मुंबई : देश स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत असताना, भारतातील अव्वल क्रमांकाचे ब्रॅण्डेड आयोडिनयुक्त मीठ असलेले टाटा सॉल्ट आपल्या ‘नमक हो टाटा का… टाटा नमक’ या ध्वनी-आधारित जाहिरात-मोहिमेचा विस्तार करून अधिकाधिक भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. योग्य त्या पोषणाविषयी आणि विशेषतः मानसिक विकासासाठी आयोडिनची भूमिका, याबाबतच्या चर्चेला चालना देत, टाटा सॉल्ट आपली बांधिलकी पुढच्या पातळीवर नेत आहे. दूरदर्शन व डिजिटल माध्यमांवर यशस्वी वाटचाल केल्यानंतर टाटा सॉल्ट हा ब्रॅंड आता ग्रामीण आणि निम-शहरी भागांत, महत्त्वाच्या प्रवासी थांब्यांवर ध्वनीप्रसारणांद्वारे आपली जाहिरात मोहीम विस्तारत आहे.
या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे ‘टाटा सॉल्ट’ची वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी-ओळख! नव्या रूपात ही ओळख साकारून चार काळजीपूर्वक तयार केलेल्या चित्रफितींमधून ती सजीव करण्यात आली आहे. सांस्कृतिक परिचय आणि राष्ट्रीय हेतू यांवर आधारलेली ही जाहिरात, आयोडिनच्या पुरेशा सेवनामुळे मुलांच्या बौद्धिक विकासावर होणारा आणि त्यातून राष्ट्राच्या दीर्घकालीन प्रगतीवर पडणारा महत्त्वाचा परिणाम अधोरेखित करते. रोजच्या स्वयंपाकघरातील एक साधा पदार्थ भविष्यातील सशक्त राष्ट्रनिर्मितीचा शांत पण प्रभावी घटक ठरू शकतो, असा संदेश ही जाहिरात देते.
व्यापक प्रमाणात अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी, गाझियाबाद, नागपूर आणि दिल्ली जंक्शनसारख्या रेल्वे स्थानकांवर, बसस्थानकांवर तसेच प्रवासी व्हॅन्सवर ‘नमक हो टाटा का… टाटा नमक’ ही जिंगल प्रसारित केली जात आहे. ही मोहीम आता पुढे वाढत मुझफ्फरपूर, पाटणा जंक्शन, हाजीपूर, आग्रा, प्रयागराज, वाराणसी, लखनौ चारबाग, इंदूर, भोपाळ, इटारसी, कटनी, सतना, नाशिक रोड, सोलापूर, खरगपूर, संत्रागाछी, मेचेदा इत्यादी महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत पोहोचत आहे. ग्रामीण भागातही आपला विस्तार साधण्यासाठी टाटा सॉल्टने महाराष्ट्रातील आणि राजस्थानातील प्रमुख बसस्थानकांवरही ध्वनीप्रसारण मोहीम सुरू केली आहे. पारंपरिक माध्यमांना ग्राहकांशी दृढ नाते निर्माण करण्यात अडचण येणाऱ्या अशा ठिकाणी दररोज प्रवास करणाऱ्या लोकांपर्यंत टाटा सॉल्ट ब्रॅंडचा संदेश पोहोचत आहे.
ग्रामीण भागात लोकांशी संपर्क सुलभतेने व्हावा या धोरणाचा भाग म्हणून टाटा सॉल्ट ‘आयोडिन एक्सप्रेस’ या मोहिमेअंतर्गत व्हॅनच्या माध्यमातून जाहिराती सादर करीत आहे. बिहारमधील २८ शहरांपर्यंत या व्हॅन पोचल्या आहेत. शालेय विद्यार्थी, तसेच बाजारपेठा, गावातील गल्लीबोळ, आठवडी बाजार येथील व्यापक समुदायांना यामध्ये लक्ष्य केले जात आहे. आयोडिनच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, सॅंपल म्हणून मिठाचे वाटप करणे आणि तळागाळात ब्रॅंडविषयी आत्मीयता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या अशा लक्ष्यित प्रयत्नांतून ‘टाटा सॉल्ट’च्या उद्देशपूर्ण व सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी संवाद साधण्याच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रत्यंतर येते. हा ब्रॅंड आपला संदेश केवळ पडद्यावर न ठेवता तो थेट रस्त्यावर नेऊन, प्रवाही ध्वनीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या दीर्घकालीन नाते जोडत राहतो.
भारत आपला स्वातंत्र्याचा ७९वा वर्धापन दिन साजरा करत असताना, टाटा सॉल्ट स्वतःची ओळख केवळ स्वयंपाकघरातील आवश्यक घटक म्हणूनच नव्हे, तर ‘देश का नमक’ म्हणून पुन्हा सिद्ध करीत आहे. भारताच्या, विशेषतः ग्रामीण भागाच्या हृदयापर्यंत पोहोचणारा आणि आयोडिनच्या महत्त्वाबाबत जागरूकतेची सर्वाधिक गरज असलेल्या ठिकाणी विश्वासार्ह सोबती ठरणारा हा ब्रॅंड झाला आहे.

