Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सिंहगड रोड उड्डाणपूल सुरू करण्यासाठी शिवसेनेचे “ॐ फट स्वाहा आंदोलन” मुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास मंत्री प्रकट व्हा – आगळेवेगळे आंदोलन

Date:

पुणे :
सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी ते माणिकबाग हा उड्डाणपूल पूर्ण होऊनसुद्धा फक्त सत्ताधारी नेत्यांच्या उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्याने जनतेला वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पुणे शहराच्या वतीने आज आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या पदमा सोरटे, सचिन पासलकर, संतोष गोपाळ, नितीन वाघ, महेश मते, गोकुळ करंजावणे, अनंत घरत, किशोर रजपूत, महेश पोकळे, अमोल दांगट, वैभव हनमघर, पराग थोरात, दिलीप पोमण, राजाभाऊ चव्हाण, शिवा पासलकर, नाना मरगळे, नागेश खडके, प्रसाद गिजरे, मिलिंद पत्की, उमेश सुर्वे, अरुण घोघरे, दत्ता घुले, संग्राम गायकवाड, निलेश वाघमारे, महेश विटे, गणपत खटपे, धनंजय खाडे, प्रथमेश भुकन, कल्पेश वाजे, केतन शिंदे, विनायक नलावडे, आकाश यादव तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेसमोर “ॐ फट स्वाहा” म्हणत होम-हवन करून पूल जनतेसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान “सिंहगड रोडवासीयांना ट्रॅफिक जॅममध्ये अडकवणाऱ्या सरकारचा निषेध होवो” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले :
“पुलाचे काम जनतेच्या कररूपी पैशातून पूर्ण झाले असूनही केवळ सत्ताधाऱ्यांच्या उद्घाटन सोहळ्याच्या हव्यासापोटी नागरिकांची गैरसोय केली जात आहे. आज पुण्यातच असले तरी मुख्यमंत्री फडणवीस उड्डाणपुलाचे उद्घाटन करायला आले नाहीत. कारण फक्त दोन दिवसांच्या पावसात या नव्या पुलावर खड्डे पडले आहेत. पुढील पाच दिवसांत पूल सरकारने सुरू केला नाही तर शिवसेना स्वतःच्या पद्धतीने जनतेसह या पुलाचे उद्घाटन करेल.”
          यावेळी आंदोलनस्थळी पुणे मनपा चे प्रकल्प अधिकारी संभाजी कोटकर उपस्थित होते त्यांनी येत्या ४ दिवसात सर्व कामे पूर्ण करून हा उड्डाणपूल सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...