पुणे- हरविलेले ४१ मोबाईल शोधून पोलिसांनी ते मुळ मालकांना अर्थात तक्रारदारांना ७९ व्या स्वांतत्र दिनि परत केलेत . या मोबाईलची किंमत साधारतः ५ लाख रुपये असून ते विविध जिल्ह्यातुन तसेच विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने परिश्रम घेतले.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर कक्षाचे सपोनि संतोष पाटील, पोलीस अमंलदार तेजस चोपडे व आदेश चलवादी, यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करुन, त्याबाबत तांत्रिक तपास करुन/त्याचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तसेच इतर राज्यात वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्याशी तसेच संबधीत पोलीस ठाणेस संवाद साधून हरवलेले एकुण ५ लाख रु.कि.चे एकुण ४१ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबधीत तक्रारदार यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे परीमंडळ ०१ चे पोलीस उपआयुक्त, कृषीकेश रावले व तसेच सहा. पोलीस आयुक्त, साईनाथ ठोंबरे यांचे हस्ते परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.
पोलिसांनी असेही म्हटले आहे कि,’मोबाईल तात्काळ ऑनलाईन हरवल्याची पुणे पोलीसांचे punepolice.gov.in/LostFoundReg या वेबसाईटला प्रथम तक्रार नोंद करावी, नोंद करताना जवळचे पोलीस स्टेशनचे नाव त्यात सिलेक्ट करावे व आपले जवळच्या पोलीस स्टेशनला जावुन त्याची एक कॉपी द्यावी. त्यानंतर हरवलेले मोबाईल मधील त्याच नंबरचे नविन सिमकार्ड घेवुन ते चालु करुन घेतल्यानंतर शासनाचे https://www.ceir.gov.in/ (CEIR) या पोर्टलवर नोंद करावी. नोंद करताना सदर वेबसाईटवर अर्जदाराचे तक्रारीची प्रत, मोबाईल पावती तसेच ओळखपत्र याची PDF अपलोड करुन चालु केलेल्या मोबाईल वर OTP प्राप्त करुन समाविष्ठ (सबमिट) करावी.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्तअमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १ कृषीकेश रावले, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि . महेश बोळकोटगी, पोनि (गुन्हे) धंनजय पिंगळे, सपोनि संतोष पाटील, मपोउप मनिषा वलसे, मपोहवा नलिनी क्षीरसागर, पोशि आदेश चलवादी, पोशि तेजस चोपडे, पोशि नवनाथ आटोळे यांनी केली आहे.

