जगातील पहिली बॅटमॅन-प्रेरित एसयूव्ही व्यावसायिक वापरासाठी
किंमत ₹ 27.79 लाख | मर्यादित 300 युनिट्स
23 ऑगस्ट 2025 पासून बुकिंग सुरू
मुंबई- : वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी ग्लोबल कंझ्युमर प्रोडक्ट्स (WBDGCP) च्या सहकार्याने महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही BE 6 बॅटमॅन एडिशन सादर करते आहे. सध्या याची संख्या मर्यादित आहे. असं म्हणतात की, काही वाहने तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी असतात. तर काही तुम्हाला मनापासून भावतात, म्हणजेच ती तुमच्या मनाच्या जवळ असतात. BE 6 बॅटमॅन एडिशन ही निश्चितच दुसऱ्या श्रेणीत येते. क्रिस्टोफर नोलनच्या ‘द डार्क नाइट ट्रायोलॉजी’ या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सला समीक्षकांनी चांगलेच उचलून धरले होते. त्यानेच प्रेरित होत सिनेमॅटिक वारसा आणि आधुनिक आलिशानपणा यांचे दुर्मिळ मिश्रण म्हणजे ही कार.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटो अँड फार्म सेक्टरचे चीफ डिझाईन अँड क्रिएटिव्ह ऑफिसर प्रताप बोस म्हणतात: “बीई 6 नेहमीच हटके आणि पुढचा विचार करते. बॅटमॅन एडिशनसह आम्हाला ग्राहकांना असे काहीतरी द्यायचे होते जे त्यांच्या जवळचे असेल. जे काही बनवायचे ते इतके आकर्षक बनवायचे की, ते असणे म्हणजे आपल्याकडे एखादी मौल्यवान गोष्ट असल्यासारखे वाटले पाहिजे. यावर काम करताना आम्ही अगदी छोट्यातल्या छोट्या तपशीलावरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच तुम्ही जेव्हा जेव्हा तिच्याकडे पाहाल तेव्हा तुम्हाला त्यात काहीतरी नवीन सापडेल.”
बॅटमॅनचे आकर्षण अनेक पिढ्यांना आहे. आजच्या पुढच्या पिढ्यांमध्येही ते दिसून येते. कॉमिक पुस्तके आणि अॅनिमेटेड मालिकांपासून ते ब्लॉकबस्टर चित्रपटांपर्यंत अनेक दशके हे पात्र महत्त्वाचे आहे. बुद्धिमत्ता, कौशल्य आणि टेक्नोसॅव्ही असलेला बॅटमॅन मुलं आणि मोठे अशा दोघांनाही आवडतो. BE 6 ची बॅटमॅन आवृत्ती ग्राहकांना याच वारशाचा आनंद देते. तसेच लोकप्रिय संस्कृतीतील सर्वांच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाशी जोडले जाण्याचा आनंद चाहत्यांना मिळतो.
या अनोख्या भागीदारीबद्दल वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी ग्लोबल कंझ्युमर प्रॉडक्ट्स, एपीएसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम शर्मा म्हणाले,“बॅटमॅन हा केवळ पॉप-कल्चर आयकॉन नाही – तर तो नावीन्य, सर्वसमावेशकता दाखवण्यासोबतच स्वतःच्या क्षमता ओळखण्याची प्रेरणा देतो. हेच धाडस रस्त्यावर अनुभवण्याची संधी आमचे हे सहकार्य देते – इलेक्ट्रिक पद्धतीने. या लिमिटेड एडिशन गाडीसह भारतातील बॅटमॅनचे चाहते आता प्रत्येक वेळी गाडी चालवताना बॅटमॅनचा थरार अनुभवू शकतात, हा माझा दावा आहे.”
या उत्पादनाच्या भारताच्या कनेक्शनबद्दल वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी साउथ एशियाचे वरिष्ठ संचालक, कंझ्युमर प्रॉडक्ट्स आनंद सिंग म्हणाले, “जगातील कोणत्याही देशापेक्षा बॅटमॅनचे सर्वाधिक आणि उत्साही चाहते भारतात आहेत. आणि त्याच आवडीला ही भागीदारी अशा प्रकारे जिवंत करते आहे. बॅटमॅनच्या कालातीत आकर्षणाला इलेक्ट्रिक मोबिलिटीची जोड देत आम्ही असे उत्पादन आणले आहे, ज्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड आहे.”
पॅक थ्री 79 किलोवॅट क्षमतेच्या व्हेरिएंटवर आधारित त्याच्या सर्व अनोख्या वैशिष्ट्यांसह BE 6 बॅटमॅन एडिशनमध्ये स्वतःला झोकून द्या…यामुळे तुम्ही चकित तर व्हालच पण तुम्हाला प्रेरणा देखील मिळेल
बाह्य डिझाइनची वैशिष्ट्ये
- बॅटमॅन एडिशनमधील कस्टम सॅटिन ब्लॅक कलर प्रीमियर
- समोरच्या दारांवर कस्टम बॅटमॅन डेकल
- आक्रमक, अॅथलेटिक स्टँडसाठी R20 अलॉय व्हील्स
- अल्केमी गोल्ड-पेंटेड सस्पेंशन आणि सॅटिन ब्लॅक बॉडीच्या तुलनेत ब्रेक कॅलिपर बोल्ड, प्रीमियम कॉन्ट्रास्ट आहेत
- “BE 6 × द डार्क नाइट”, मर्यादित आवृत्ती, गाडीचे बॅजिंग मागच्या बाजूला
- द डार्क नाईट ट्रायॉलॉजीमध्ये दिसणारे बॅट चिन्ह, ठळकपणे लावले आहे:
o हब कॅप्स
o फ्रंट क्वार्टर पॅनल्स
o रिअर बंपर
o खिडक्या आणि मागची काच
· द डार्क नाइट ट्रायलॉजी बॅट एम्ब्लेम असलेले इन्फिनिटी रूफ
· नाईट ट्रेल – द डार्क नाइट ट्रायलॉजी बॅट एम्ब्लेम लोगो प्रोजेक्शनसह कार्पेट लॅम्प
· पाठच्या दरवाजाच्या क्लॅडिंगवर ‘बॅटमॅन एडिशन’ सिग्नेचर स्टिकर
आतील डिझाइनची वैशिष्ट्ये
- डॅशबोर्डवर अल्केमी गोल्ड बॅटमॅन एडिशन नंबरप्लेट
- ड्रायव्हर कॉकपिटभोवती ब्रश केलेले सोनेरी हॅलो असलेले चारकोल लेदर इन्स्ट्रुमेंट पॅनल (IP)
- सोनेरी सेपिया असेंट स्टिचिंग आणि लेदर अपहोल्स्ट्रीसह समृद्ध अनुभवासाठी द डार्क नाइट ट्रायलॉजी बॅट एम्ब्लेम
- सोनेरी-अॅक्सेंट स्टीयरिंग व्हील, इन-टच कंट्रोलर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, अल्केमी गोल्ड डिटेलिंगसह कस्टम की फोब
- डार्क नाईट ट्रायॉलॉजी बॅट एम्ब्लेम कशावर:
- “बूस्ट” बटण
- सीट्स
- आतील लेबल्स
- प्रवासी डॅशबोर्ड पॅनलवर पिनस्ट्राइप ग्राफिक आणि द डार्क नाइट ट्रायलॉजी बॅट एम्ब्लेम
- इन्फोटेनमेंट डिस्प्लेवरील बॅटमॅन एडिशन वेलकम ऍनीमेशन तसेच बॅटमॅन एडिशन ब्रँडिंग रेस कार प्रेरित ओपन स्ट्रॅप्स
- कस्टम बॅटमॅन प्रेरित बाहेरील इंजिनाचा आवाज
याच्या आतील आणि बाहेरची एवढी तपशीलवार माहिती ही आपल्या जवळची वस्तू वाटावी यासाठी आहे – जसे एसयूव्ही आणि ड्रायव्हर यांच्यातील नाते असते.
ही केवळ एसयूव्ही नाही तर त्यापेक्षा कैक पटीने काहीतरी जास्त आहे. बॅटमॅनच्या वारशातील ही एक संग्रहणीय कार आहे, जी आंतरराष्ट्रीय बॅटमॅन दिनाचे औचित्य साधत प्रदर्शित झाली. आणि ज्यांना त्यांच्या ड्रायव्हिंगसाठी एक आठवणीतली गोष्ट हवी आहे, त्यांच्यासाठीच ती राखीव आहे.
नोंदणीला सुरुवात: 23 ऑगस्ट 2025
वितरणाला सुरुवात: 20 सप्टेंबर 2025 — आंतरराष्ट्रीय बॅटमॅन डे

