पुणे-लष्कर परिसरातील कॅम्प भागात 30 ते 35 वर्षात वयोगटातील तरुणाचा खून झाला आहे. लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताबूत स्ट्रीट येथे दिल्ली दरबार हॉटेलच्या पुढे 30 ते 35 वयोगटातील एका तरुणावर कोणत्याही धारदार कोयतेने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले आहे .याप्रकरणी पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवाविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. अद्याप मयातची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर खुनातील आरोपींचा शोध पोलिस घेत आहे .घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा माग काढण्यात येत आहे .याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके.9527977977 याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
कॅॅम्पातील ताबूत स्ट्रीटवरही खून
Date:

