महाराष्ट्रात छतावरील सौरऊर्जा प्रसाराला गती देणार
· स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विशेष योजना जाहीर – फक्त १९४७ रुपयांमध्ये छतावरील सौर प्रणालीचे मालक होण्याची संधी; ही रक्कम स्वातंत्र्य वर्षाचे प्रतीक असून, महागड्या वीजबिलांपासून मुक्ततेचेही प्रतीक.
· राज्यात पुढील तीन वर्षांत ८०० मेगावॅट इतकी रूफटॉप सोलर यंत्रणा बसविण्याचे कंपनीचे लक्ष्य.
· ‘रूफटॉप सोलर’चे एक हजार चॅनेल भागीदार व किरकोळ विक्रेते नियुक्त करण्याची योजना, त्यामुळे वितरणाचे जाळे होणार अधिक बळकट.
· निवासी ग्राहकांसाठी ‘लाइफस्टाइल सोल्युशन्स’ सादर; यामध्ये ‘मायसाईन’ ही अखंडित वीजपुरवठ्यासाठी कॉम्पॅक्ट, बुद्धिमान सोलर + बॅटरी बॅकअप प्रणाली; तसेच ‘सोलर डिझाईन स्पेसेस’ या टिकाऊपणा व सौंदर्याचा संगम असलेल्या २५ निवडक आकर्षक रूफटॉप यंत्रणांची श्रेणी, यांचा समावेश.
पुणे, १३ ऑगस्ट २०२५ : ‘टाटा पॉवर’ची उपकंपनी असलेल्या व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपनी अशी ख्याती मिळवलेल्या ‘टाटा पॉवर रिन्यूएबल्स’ने आज पुण्यात घरघर सोलर ही आपली महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली. या उपक्रमाचा उद्देश निवासी घरांवर सौरऊर्जा प्रणालींचा वापर वाढवणे हा असून, दर्जेदार, परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध सौरऊर्जा उपायांसह विश्वासार्ह सेवा प्रदान करणे हे त्यामागचे ध्येय आहे.
टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचा एक भाग असलेल्या ‘टाटा पॉवर सोलारूफ’ने ‘घरघर सोलर’ मोहिमेदरम्यान महाराष्ट्रासाठी विशेष योजना जाहीर केली असून, ती स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सादर करण्यात आली आहे.
नव्या योजनेत ग्राहकांना फक्त १९४७ रुपये भरून छतावरील सौर प्रणालीचे मालक होता येईल. ही रक्कम भारताच्या स्वातंत्र्य वर्षाचे प्रतीक असून, जास्त रकमेच्या वीजबिलांपासून स्वातंत्र्य ही संकल्पना ती दर्शवते. या प्रणालीच्या किंमतीसाठी जवळपास १०० टक्के कर्जसुविधा उपलब्ध आहे. दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी २३६९ रुपयांपासून सुरू होणारे परवडणारे मासिक हप्ते, ६० महिन्यांपर्यंतचा सोयीस्कर कर्जकालावधी आणि जलद प्रक्रियेसाठी त्वरित डिजिटल कर्जमंजुरीची सुविधा अशी या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. अतिरिक्त लाभ म्हणून, ‘टाटा पॉवर सोलारूफ’च्या सर्व निवासी ग्राहकांना ‘टाटा एआयजी’ कंपनीकडून एक वर्षाची मोफत सौर विमा सुविधा देण्यात येत आहे.
योजनेचे तपशील :
| पर्याय | २ केडब्ल्यूपी | ३ केडब्ल्यूपी | ५ केडब्ल्यूपी | १० केडब्ल्यूपी |
| प्रारंभिक भरणा | १९४७ | १९४७ | १९४७ | १९४७ |
| अनुदानपूर्व ईएमआय | ३८५९ | ५०८० | ८२५४ | १४११४ |
| अनुदानानंतर ईएमआय | २३६८ | ३१४३ | ६३१७ | १२१७७ |
| कालावधी (महिने) | ६० | ६० | ६० | ६० |
*ही अंदाजे संख्या असून, प्रणालीची किंमत व कालावधी यानुसार त्यात बदल होऊ शकतो.
‘पंतप्रधान सूर्य घर योजने’अंतर्गत निवासी ग्राहकांना केंद्र सरकारकडून पहिल्या २ किलोवॅट क्षमतेसाठी प्रति किलोवॅट ३०,००० रुपये आणि त्यानंतरच्या १ किलोवॅटसाठी प्रति किलोवॅट १८,००० रुपये इतकी अनुदानाची तरतूद आहे. ३ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या प्रणालीसाठी एकूण अनुदानाची कमाल मर्यादा ७८,००० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांनी सौरऊर्जेचा स्वीकार जास्तीत जास्त करावा यासाठी ‘टाटा पॉवर सोलारूफ’ने एसबीआय, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक यांसह १५ आघाडीच्या वित्तीय संस्थांशी भागीदारी केली असून, निवासी ग्राहकांसाठी सुलभ कर्जसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
‘टाटा पॉवर सोलारूफ’ने महाराष्ट्रात जुलै २०२५पर्यंत एकूण ७७५ एमडब्ल्यूपी इतक्या क्षमतेच्या निवासी छतांवर सौरऊर्जा यंत्रणा बसविल्या असून, याचा लाभ २७,९१० ग्राहकांना मिळाला आहे. पुढील तीन वर्षांत आणखी ८०० मेगावॅट क्षमतेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुण्यात आधीच २०० मेगावॅट क्षमतेसह भक्कम उपस्थिती असलेल्या कंपनीने त्याच कालावधीत आणखी २५० मेगावॅट क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे राज्यात स्वच्छ ऊर्जेचा प्रसार गतीमान करण्याच्या तिच्या बांधिलकीला अधिक बळ मिळणार आहे.
तसेच, कंपनीने पुढील तीन वर्षांत १,००० चॅनेल भागीदार आणि किरकोळ विक्रेते नियुक्त करून महाराष्ट्रातील आपली कार्यव्याप्ती वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे तिचे वितरणाचे जाळे अधिक सक्षम होणार आहे. टाटा पॉवर सोलारूफ संपूर्ण देशभरातील ग्राहकांना उच्च कार्यक्षमतेचे मॉड्यूल, २५ वर्षांची हमी, विमा, केंद्रिय अनुदान, सोयीस्कर वित्तीय सुविधा आणि उत्कृष्ट विक्रीपश्चात सेवा अशी वैशिष्ट्ये असलेले ‘रूफटॉप सोलर’मधील एक संपूर्ण सोल्युशन आतापर्यंत देत आली आहे.
छतावरील सौरऊर्जा यंत्रणेला अधिक लोकप्रिय करण्यासाठी ब्रँडिंग आणि जाहिरातींची व्यापक मोहीम आणि त्यातून जनजागृती उपक्रम कंपनी हाती घेणार आहे. यामध्ये सौर उपायांचे फायदे, स्वीकारण्याची सुलभ प्रक्रिया, आयुष्यभराची सेवा आणि दर्जाची हमी या बाबींवर विशेष भर दिला जाईल.
स्वच्छ ऊर्जेविषयीच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘टाटा पॉवर सोलारूफ’ने निवासी ग्राहकांकरीता दोन लाइफस्टाइल सोल्युशन्स सादर केली आहेत. यातील ‘मायसाईन’ ही यंत्रणा कॉम्पॅक्ट व बुद्धिमान स्वरुपाची सोलर + बॅटरी बॅकअप अशी प्रणाली असून ती अखंडित वीजपुरवठा देते. त्याचप्रमाणे ‘सोलर डिझाईन स्पेसेस’ या प्रणालीमध्ये टिकाऊपणा व सौंदर्य यांचा संगम असलेल्या २५ आकर्षक रूफटॉप सोलर यंत्रणांची निवडक श्रेणी समाविष्ट आहे. ही दोन्ही उत्पादनेही स्वातंत्र्य दिनाच्या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून देशातील अव्वल क्रमांकाची रूफटॉप सोलर कंपनी असलेली टाटा पॉवर सोलारूफ आपल्या ग्राहकांना मॉड्यूलवर २५ वर्षांची हमी, विश्वासार्ह दर्जाची खात्री, ४५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये विशेष विक्री व सेवा, संपूर्ण भारतात आयुष्यभराची सेवा व विक्रीपश्चात सहाय्य, सोयीस्कर वित्तपुरवठ्याचे पर्याय आणि छतावरील सौर प्रणालींसाठी विमा अशा व्यापक सुविधा प्रदान करीत आहे.
सुलभ वित्तपुरवठा, देशव्यापी उपस्थिती आणि विविध नाविन्यपूर्ण उपायांद्वारे टाटा पॉवर स्वच्छ ऊर्जेला मुख्य प्रवाहात आणत आहे आणि प्रत्येक भारतीय घराला सौरऊर्जा वापरण्यास सक्षम करत आहे.
#GharGharSolar या मोहिमेअंतर्गत छतावरील सौरऊर्जा स्थापनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांनी १८००२५७७७७७ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन कंपनीने केले आहे.

