डिजिटल जगात स्वतःचे संरक्षण कसे करावे पद्मावती अॅरेझ व्हील्स कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम संपन्न
पुणे- पद्मावती अॅरेझ व्हील्स येथे कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी इम्पॅक्ट अॅक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली. परस्परसंवादी सत्रे, प्रत्यक्ष उदाहरणे आणि उपयुक्त सुरक्षा टिप्स यांच्या माध्यमातून आपण लोकांना डिजिटल जगात स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल सतत जनजागृती करत राहणे आवश्यक आहे असे येथे अवंती दळवी यांनी सांगितले .
हा उपक्रम एस.पी. कॉलेज आणि क्विक हील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ईशा जोशी आणि अवंती दळवी यांनी मार्गदर्शन केले. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी व त्यांना सायबर सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या समर्पित प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. सत्रादरम्यान कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व सायबर गुन्ह्यांबाबतचे स्वतःचे अनुभव शेअर केले, ज्यामुळे हा उपक्रम माहितीपूर्ण व परिणामकारक ठरला.

