पुणे दि.12:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित आणि विकास महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींनी स्वयंरोजगाराकरीता विविध योजनांअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे; याकरिता www.msobcfdc.org/msobefde.in या संकेतस्थळावर ऑनलाईनपध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्रमांक-बी, सर्वे क्रमांक, 104/105, मनोरुग्णालय कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, येरवडा. दुरध्वनी क्रमांक 020-29523059, ईमल पत्ता-dmobcpune@gmail.com यावर संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

