पुणे –
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्य प्रमुख संघटक पदी पुन्हा प्रशांत कनोजिया यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्यातील मनविसे वर्धापन दिन मनविसे कर्जत येथील शिबिरात राज्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात प्रशांत कनोजिया यांच्यावर
पुन्हा “राज्य प्रमुख संघटक”
पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थी दशेपासुन सामाजिक चळवळीत कार्य करणारे कनोजिया यांनी महाविद्यालयात शाखाध्यक्ष , विभाग अध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदापासून अनेक पदांवर आजपर्यंत यशस्वी कार्य केले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न असो किंवा पालकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आवाज उठविण्यासाठी वेळोवेळी आंदोलन केलेले आहे. विद्यार्थी न्याय हक्कासाठी जेल भोगली आहे
समाजातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते सतत आग्रही आणि आक्रमक राहिलेले आहेत. वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या
रुग्णवाहिकांना सहज सुकर मार्ग मिळावा आणि रुग्णांना, अपघातग्रस्तांना वेळेत हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत यासाठी कनोजिया यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या हेल्प रायडर्स एक जीव वाचवण्याची चळवळीचे कार्य राज्यस्तरावरच नाही तर आंतरराज्य पातळीवर पसरले आहे.मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोपवलेली प्रत्येक जबाबदारी निश्चितच पार पाडली जाईल. विद्यार्थी आणि पालकांसाठी दिशादर्शक कार्य केले जाईल विद्यार्थी सुरक्षा व हक्काच्या शैक्षणीक सुविधा भेटण्यासाठी
पालकांची फसवणूक,पिळवणूक या विषयावर विशेष कार्य करणार आहे अशी ग्वाही नियुक्तीनंतर प्रशांत कनोजिया यांनी दिली.

