पुणे – भारत – जपानमधील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कपड्यांचा ब्रँण्ड युनिक्लो आता पुण्यात दाखल होत आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी द पॅव्हिलियन मॉलमध्ये पहिले स्टोअर सुरु होणार असल्याची घोषणा पॅव्हिलियनकडून नुकतीच करण्यात आली. पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून उद्यास येत असल्याने या शहरांत युनिक्लो आपले स्टोअर सुरु करण्यात असल्याचे कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. लाईफवेअर संकल्पनेवर आधारित कपड्यांची खरेदी करण्याचा नवा अनुभव पुणेकरांना घेता येईल. पुण्यातील नवे स्टोअर हे युनिक्लोच्या पश्चिम भारतातील विस्ताराचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हे युनिक्लोचे भारतातील १८वे स्टोअर असेल. या नव्या स्टोअरच्या माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत लाइफवेअर पोहोचवण्याचा ब्रँण्डचा उद्देश आहे.
पुण्यात लवकरच दाखल होणा-या नव्या स्टोअरबाबत युनिक्लो इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केंजी इनोए यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले. “ पुणे हे वेगाने वाढणारे शहर आहे. या शहरात चैतन्यमय जीवनशैली आढळते. पुण्यात आमच्या लाईफवेअर संकल्पनेवर आधारित कपड्यांची गुणवत्ता ग्राहकापर्यंत पोहोचवता येणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. मुंबईतीस स्टोअरच्या यशानंतर पुण्यातील द पॅव्हेलियन येथे सुरु झालेले स्टोअर हे पहिले पश्चिम भारतातील विस्ताराचा प्रमुख टप्पा आहे. आम्ही संपूर्ण भारतात विस्तार करणार आहोत. भारतातील सर्व ग्राहकांना लाईफवेअर कपड्यांची उपलब्धता करुन देणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
पुण्यात वाढती विद्यार्थी संख्या, व्यावसायिकांची वर्दळ पाहता येथील कपड्यांची फॅशन आता बदलू लागली आहे. युनिक्लो हे फॅशन ब्रॅण्ड दैनंदिन जीवनातील कपड्यांमध्ये उच्च दर्ज्याची फॅशन उपलब्ध करुन देते. पुणेकरांची फॅशनची बदलती मागणी लक्षात घेत युनिक्लो या शहरवासीयांना निश्चितच दैनंदिन जीवनातील कपड्यांमध्ये चांगली गुणवत्ता उपलब्ध करुन देईल.
द पॅव्हिलियन मॉलच्या तळमजल्यावरील ९२१३ चौरस फूट या विस्तीर्ण जागेवर युनिक्लोचे स्टोअर पुणेकरांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. रोजच्या जीवनातील चांगल्या डिझाइन्सचे कपडे युनिक्लोमध्ये उपलब्ध असतील. महिला व पुरुषांसह लहान मुले आणि नवजात शिशूंचे कपड्यांची नवी रेंजही खरेदी करता येईल. युनिक्लोची सिग्निचर कॅटेगरी असलेली फ्लॅनल शर्ट्स, डॅनिम्स, निट्स, ब्रा टॉप्स, कोअर टीशर्ट्स, इजी पॅन्ट्स, पॉलोज तसेच खास युनिक्लोची नावीन्यपूर्ण शैली असलेली हिटेक्स, फ्लीस, पफटेक या फॅब्रिकमध्ये या कपड्यांची रेंज उपलब्ध असतील.

