डिजिटल पेमेंट्स आता केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते भारतभरात मोठ्या शहरापासून लहान गावांपर्यंत प्रत्येकाच्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाले आहे. जास्तीत जास्त नागरिक दैनंदिन गरजांसाठी पेमेंट अॅपकडे वळत असून डिजिटल मनी मॅनेजमेंट वेगाने विकसित होत आहे. ही व्यवस्था आता केवळ पैसे पाठवण्यापुरती किंवा मिळवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यात खर्चावर देखरेख करण्यापासून, बिलांची अद्ययावत माहिती मिळवण्यापर्यंतच्या सोयी आणि आर्थिक निर्णय योग्य माहितीसह सहजपणे, आत्मविश्वासाने घेता यावेत यासाठी टुल्सचा समावेश आहे.
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी युजर्सना भिम पेमेंट अॅप वापरून पुढील सहा मार्गांनी अर्थपूर्ण स्टेप्स घेता येतील –
1. तुमच्यासाठी सोयीच्या असलेल्या भाषेत पेमेंट्स करा
भिम पेमेंट्स अॅपद्वारे हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि ओडिया यांसह १५ भाषांमध्ये सेवा दिली जाते. यामुळे युजर्सना हे अॅप वापरणं सोपं जातं व त्यांना आपल्या आवडीच्या भाषेत व्यवहार पूर्ण करता येतो. यामुळे विशेषतः दुकानदार, ज्येष्ठ नागरिक किंवा दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांतले फर्स्ट टाइम युजर्स यांची मोठी सोय होते. आपल्याला माहीत असलेल्या भाषेत संवाद साधणं सोपं वाटतं आणि विश्वास वाढतो. पर्यायाने डिजिटल व्यवहार भीतीदायक वाटत नाहीत.
2. इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असतानाही व्यवहार करण्याची सोय
हे अॅप कमी किंवा अस्थिर इंटरनेट सुविधा असतानाही चालत असल्यामुळे ग्रामीण भागातील युजर्ससाठी किंवा सतत नेटवर्क इश्यू असलेल्या ठिकाणी ते फायदेशीर ठरतं. स्थानिक बाजारात असताना किंवा रोजच्या कामाच्या वेळी महत्त्वाची पेमेंट्स पूर्ण होत असल्याचा विश्वास नक्कीच लाभदायक ठरतो.
3. कोणतेही अतिरिक्त प्रयत्न न करता खर्चाचा आढावा
भिम पेमेंट्स अॅपमध्ये स्पेंड्स अनालिटिक्ससारखी वैशिष्ट्ये समाविष्ट असल्यामुळे युजर्सना त्यांचे पैसे नेमके कुठे खर्च होतात याचा मासिक आढावा घेता येतो. स्पिल्ट एक्सपेन्सेसारख्या पर्यायामुळे लोकांना त्यांचे कुटुंबीय किंवा मित्रपरिवारासोबत सहजपणे खर्च वाटून घेता येतो. रूममेट्स, एकत्र प्रवास करताना किंवा एकत्रितपणे किराणा खरेदी करताना सहजपणे ट्रॅकिंग करता येते.
4. संपूर्ण खर्चाचा समन्वय एकाच ठिकाणी
फॅमिली मोडच्या मदतीने युजर्सना त्यांच्या कुटुंबातील सदस्य ऑनबोर्ड करता येतील, विशिष्ट पेमेंट्स असाइन करता येतील व एकत्रित खर्च पाहाता येतील. बिलं मॅनेज करणारं एखादं जोडपं असो किंवा एकत्रित खर्च करणारे भाऊ- बहीण असो, या सुविधेमुळे प्रत्येकाला माहिती मिळते व खर्च सुरळीतपणे जाणून घेता येतो.
5. विश्वासार्ह व्यक्तींना पेमेंट्समध्ये मदत करण्याची मुभा द्या, नियंत्रण आपल्या हातात ठेवून
युपीआय सर्कल सुविधेमुळे युजर्सना त्यांच्या ऐवजी पेमेंट इनिशिएट करणाऱ्या व्यक्तींचं नेटवर्क तयार करता येतं. यामध्ये प्रत्येक व्यवहारासाठी प्रायमरी युजरची परवानगी आवश्यक असते. केयरगिव्हर्स किंवा मुलं अथवा घरातल्या मदतनीसांना खरेदी करू देणाऱ्या बिझी आई- वडिलांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरते. त्यांना किराणा किंवा युटिलिटी बिल्ससारखी दैनंदिन पेमेंट्स सहजपणे करता येतात. विशेष म्हणजे, हे करताना त्यांना प्रत्येक व्यवहाराची माहिती आणि पूर्ण नियंत्रण ठेवता येतं.
6. महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी रिमाइंडर्स
अॅक्शन नीडेड या सेक्शनमध्ये राहिलेली पेमेंट्स, कमी बॅलन्स किंवा युपीआय लाइट अॅक्टिव्हेशन यांसाठी रिमाइंडर्स दिला जातो. अशा रिमांइंडर्समुळे महत्त्वाची पेमेंट्स राहून जाण्याची शक्यता कमी होते व युजर्सना रोज स्वतःहून ट्रॅक करण्याची गरज राहात नाही. त्यांना आपोआप अपडेट्स मिळतात. त्याशिवाय युजर्सना वीज, पाणी आणि इतर युटिलिटी बिल्स थेट अॅपद्वारे भरता येतात. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त किंवा छुपे शुल्क आकारले जात नाही. यामुळे मासिक खर्चाचे व्यवस्थापन सोपे होते.
वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये सोपे, विश्वासार्ह टुल हाताशी असणं हा पैसे स्वतंत्रपणे हाताळण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे. अशाप्रकारच्या सुविधा देशभरातील युजर्सना आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यासाठी मदत करतील.

