सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांचे निर्देश
मुंबई, दि. 7 आँगस्ट
मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत म्हणून एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संबंधित खात्यांची संयुक्त समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले.
महाराष्ट्रातील एक पडदा चित्रपटगृह यांची अवस्था दयनिय असून या चित्रपटगृहाबाबत सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अथवा अनुदान द्यावे अथवा अन्य मदत करावी या मागणीसाठी विविध संस्था आणि चित्रपटगृह मालक, चालक संघटनेना, कलावंत, चित्रपट निर्माते यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना विविध निवेदन दिली होती. त्याबाबत आज मंत्री एँड आशिष शेलार यांनी सांस्कृतिक कार्य विभाग, गोरेगाव फिल्म सिटी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला चित्रपट गृह मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, नगरविकास, गृह, महसूल,. वित्त आणि सांस्कृतिक कार्य विभाग व या क्षेत्रातील तज्ञ यांची संयुक्त समिती गठीत करुन याबाबत सविस्तर अभ्यास करण्यात यावा व त्याचा अहवाल दोन महिन्यात सादर करण्यात यावा तसेच जी 300 चित्रपट गृहे सुरु आहेत तसेच जी बंद आहेत अशा सर्व एक पडदा चित्रपट गृहांमध्ये मराठी सिनेमा दाखवण्यात येणार असेल तर त्यासाठी काही शासन प्रोत्साहन योजना आणू शकते का? याचा ही विचार या समितीने करावा, अशा सूचना ही मंत्री शेलार यांनी दिल्या.
दरम्यान, गोरेगाव मुंबई येथे प्रस्तावित असलेल्या नाट्यगृहाच्या विषयावर ही बैठक घेण्यात आली. अभिनेते सुनील बर्वे आणि गोरेगावचे नागरिक या नाट्यगृहांसाठी आग्रही असून यासाठी स्वाक्षरी मोहीम ही राबविण्यात आली होती. या प्रश्नावर महापालिका अधिकारी आणि संबधीत कलावंत व स्थानिक आमदार विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मंत्री शेलार यांनी आढावा घेतला. उपलब्ध जागा तसेच प्रस्तावित इमारतीबाबत कलावंताचे म्हणणे या सगळ्याचा विचार करुन येत्या पंधरा दिवसात संपूर्ण अहवाल सादर करा व लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल या दृष्टीने कार्यवाही करा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.
तसेच आज लावणी कलावंताच्या प्रश्नाबाबत ही बैठक घेऊन त्यांच्या समस्या मंत्री शेलार यांनी समजून घेतल्या.

