– या उपक्रमात टाटा पॉवरच्या मुळशीच्या पाणलोट क्षेत्रात ४७ एकरांवर २.७ लाख स्थानिक रोपे लावली जाणार.
– जैवविविधतेला कोणतेही नुकसान न पोहोचवण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे, त्याला अनुसरून जैवविविधता, कार्बन कमी करणे आणि स्थानिक हरित आच्छादन विस्तारास समर्थन दिले जाणार
पुणे, ०७ ऑगस्ट २०२५: भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवरने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) च्या सहकार्याने महाराष्ट्रातील मुळशी येथील त्यांच्या जलविद्युत निर्मिती केंद्रांवर मियावाकी वनीकरण उपक्रम सुरू करण्यासाठी औपचारिक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. स्थानिक जैवविविधता पुन्हा पूर्ववत करण्यासाठी, हरित आच्छादन वाढवण्यासाठी आणि टाटा पॉवरच्या दीर्घकालीन शाश्वतता उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
टाटा पॉवरच्या लोणावळा कार्यालयात या समझोता करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आली. टाटा पॉवर आणि बीएनएचएसचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. बीएनएचएसचे अध्यक्ष, श्री प्रवीणसिंग परदेशी आणि संचालक श्री किशोर रिठे तर टाटा पॉवरकडून सीएचआरओ आणि चीफ – सस्टेनेबिलिटी व सीएसआर, श्री हिमल तिवारी, कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटीच्या प्रमुख, श्रीमती वैष्णवी प्रभाकरन, सिव्हिल व इस्टेटचे प्रमुख श्री पराग राईलकर, हायड्रो प्रोजेक्ट्सचे प्रमुख श्री कुमार प्रीतम आणि हायड्रोजचे प्रमुख श्री अजय कोन्नूर उपस्थित होते.
या भागीदारीअंतर्गत टाटा पॉवर त्यांच्या हायड्रोस तलावाच्या पाणलोट क्षेत्राभोवती योग्य जमीन ओळखून ती उपक्रमासाठी देईल, स्थानिक प्रजातींबद्दल संशोधन-आधारित माहिती प्रदान करेल, तर बीएनएचएस मियावाकी वृक्षारोपणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी, देखरेख आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाचे नेतृत्व करेल. मुळशीजवळील आडगाव आणि बर्पे या गावांमध्ये ४७ एकर जागेवर पाच वर्षांत तीन टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाईल. मियावाकी तंत्राचा वापर करून, जैवविविधता पुन्हा सुरळीत करण्यासाठी, कार्बन कॅप्चर वाढविण्यासाठी, भूजलाची पातळी वाढवण्यासाठी आणि गाळ कमी करण्यासाठी ५४ स्थानिक प्रजातींसह २.७ लाख स्थानिक रोपे लावली जातील.
मियावाकी पद्धत हे वृक्षारोपणाचे एक सिद्ध तंत्र आहे, यामध्ये मर्यादित जागेत दाट, जलद वाढणारी आणि स्वयंपूर्ण स्थानिक जंगले निर्माण केली जातात. कॉम्बिनेशन्स काळजीपूर्वक निवडून, थरांमध्ये स्थानिक प्रजातींची लागवड करून, या पद्धतीमध्ये नैसर्गिक अधिवास पुन्हा पूर्ववत करण्यास प्रोत्साहन दिले जाते, मातीची गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढवली जाते, जमिनीमध्ये पाणी धारणा क्षमता सुधारली जाते आणि परागकण आणि इतर वन्यजीवांना आधार दिला जातो. मुळशीच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील पाणलोट क्षेत्रांमध्ये मियावाकी पद्धतीचा वापर केल्याने जैवविविधता पुन्हा पूर्ववत होईल, इतकेच नव्हे तर नैसर्गिक हवामान बफर देखील तयार केले जाईल आणि इकोसिस्टिमच्या दीर्घकालीन लवचिकतेमध्ये योगदान दिले जाईल.
या प्रसंगी आपले विचार मांडताना बीएनएचएसचे अध्यक्ष श्री. प्रवीणसिंग परदेशी म्हणाले, “हा प्रकल्प आणि टाटा पॉवरसोबत आमचा सहयोग या दोन्ही बाबी आम्हाला खूप जवळच्या आहेत आणि भारताच्या शाश्वत भविष्यासाठी आम्हा दोघांच्या दृष्टिकोनाचे हे प्रतिबिंब आहे. जबाबदारीचे भान राखून तयार करण्यात आलेल्या व्यवसाय पद्धती आणि समुदाय-केंद्रित उपक्रमांद्वारे शाश्वत विकासाला चालना देण्यात टाटा पॉवरने सातत्याने प्रयत्न करून एक अनुकरणीय उदाहरण समोर ठेवले आहे. नाजूक इकोसिस्टिम्सचे संवर्धन आणि स्थानिक जैवविविधता वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. राष्ट्रनिर्माण आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाला केंद्रस्थानी मानणाऱ्या कंपनीशी सहयोग केल्याने हा प्रयत्न आमच्यासाठी खरोखर अर्थपूर्ण बनला आहे.”
या प्रसंगी बोलताना, टाटा पॉवरच्या सस्टेनेबिलिटी आणि सीएसआरचे चीफ, सीएचआरओ, श्री. हिमल तिवारी म्हणाले: “एक शतकाहून अधिक काळ, पश्चिम घाटात टाटा पॉवरचे जलविद्युत प्रकल्प निसर्ग आणि विकास यामधील समन्वय दर्शवत आहेत. बीएनएचएसच्या सहयोगाने मियावाकी वनीकरणाचा हा उपक्रम त्या वारशाचा एक भाग आहे, हा उपक्रम महत्त्वाच्या इकोसिस्टिम पुन्हा पूर्ववत करेल, स्थानिक जैवविविधतेचे पुनरुज्जीवन करेल आणि कोणत्याही हवामानाला तोंड देईल अशी वृद्धी करण्याप्रती आमची वचनबद्धता मजबूत करतो. विज्ञानावर आधारित हे सहकार्य व्यवसायापुरते मर्यादित न राहता भारताच्या नैसर्गिक वारशाचे दीर्घकालीन संरक्षक म्हणून काम करणाऱ्या सस्टेनेबिलिटीच्या आमच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.”
बीएनएचएसचे संचालक श्री. किशोर रिठे म्हणाले, “बीएनएचएसने टाटा समूहासोबत दीर्घकालीन आणि विश्वासार्ह संबंध प्रस्थापित केले आहेत. या महत्त्वाच्या उपक्रमासाठी टाटा पॉवरसोबत हा सहयोग वाढवताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही एकत्र मिळून या प्रदेशात जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी मोजता येणारा प्रभाव निर्माण करू इच्छितो.”
या उपक्रमाद्वारे टाटा पॉवर त्यांच्या “सस्टेनेबल इज अटेनेबल” या फिलॉसॉफीचे मोजता येऊ शकेल अशा पर्यावरणीय कृतीत रूपांतर करत आहे. तज्ञांच्या सहकार्याने आणि शास्त्रोक्त अंमलबजावणीद्वारे, कंपनी केवळ हरित आच्छादन आणि भूजल पुनर्भरण वाढवत नाही तर कोणत्याही हवामानाला तोंड देऊ शकेल अशी वीज कंपनी म्हणून स्वतःचे स्थान देखील मजबूत करत आहे. हा उपक्रम कंपनीच्या मुख्य ऑपरेशन्समध्ये शाश्वततेचा समावेश करण्याच्या व्यापक धोरणाचे प्रतिबिंब आहे – जिथे पर्यावरणीय व्यवस्थापन, समुदायाचा सहभाग आणि दीर्घकालीन मूल्य निर्मिती यांचा मिलाप होतो.
टाटा पॉवरने स्वतःच्या विद्यमान पर्यावरणीय व्यवस्थापन उपक्रमांचा भाग म्हणून संपूर्ण भारतात ४.४ दशलक्षाहून अधिक झाडे आणि रोपे लावली आहेत. या प्रयत्नांमध्ये प्रमुख वृक्ष मित्र कार्यक्रम, कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखालील मोहीम आणि हरित आच्छादनाचा विस्तार करण्यासाठी, जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात कार्बन सिक्वेस्ट्रेशन वाढवण्यावर केंद्रित उपक्रमांचा समावेश आहे. विज्ञानावर आधारित प्रकल्प आणि धोरणानुसार आखलेल्या संवर्धन कृतीद्वारे, टाटा पॉवर कोणत्याही हवामानाला तोंड देतील अशी लँडस्केप्स आणि शाश्वत समुदाय विकासासाठी उत्प्रेरक म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे.

