यशराज फिल्म्सने आज अधिकृतरीत्या जाहीर केलं की भारतातील दोन मोठे सुपरस्टार्स – हृतिक रोशन आणि एनटीआर – यांच्यात ‘वॉर 2’ या आगामी अॅक्शनपटात होणारी डान्स टक्कर केवळ मोठ्या पडद्यावरच अनुभवता येणार आहे.
या जबरदस्त डान्स ट्रॅकचं नाव आहे ‘जनाबे आली’, ज्याला भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठ्या, भव्य आणि जोशपूर्ण डान्स सीन्सपैकी एक मानलं जात आहे.
वायआरएफ उद्या सकाळी या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित करणार आहे, जी प्रेक्षकांना या भव्य दृश्याचा थोडासा अनुभव देईल.
मात्र, या गाण्याचं पूर्ण रूप फक्त चित्रपटगृहातच पाहता येईल, कारण ते खास सिनेमॅटिक अनुभवासाठी डिझाइन करण्यात आलं आहे.
वायआरएफ ने आपल्या सोशल पोस्टमध्ये म्हटलं आहे: “डान्स फ्लोरवरही होईल वॉर! उद्या पाहा त्या डान्स राइव्हलरीची झलक – जी तुम्हाला केवळ मोठ्या पडद्यावरच पाहायला मिळेल, जेव्हा ‘वॉर 2’ 14 ऑगस्टपासून हिंदी, तेलुगु आणि तमिळमध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित होईल!
#JanaabeAali #SalamAnali #Kalaaba”
‘वॉर 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे आणि निर्मिती आदित्य चोप्रा यांची आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असून, त्यात अॅक्शन, भव्य दृश्यं आणि आता एक विस्मयकारक डान्स शोडाउन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘वॉर 2’ 14 ऑगस्ट 2025 रोजी जगभरात हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


