काम करणाऱ्या भारतीय महिलांमध्ये कमी असलेले विमा संरक्षण प्रमाण भरून काढण्यासाठी महिला-केंद्रित लाभ, सर्वसमावेशक संरक्षण आणि परवडणाऱ्या प्रीमियमसह असलेली योजना
मुंबई, 5 ऑगस्ट 2025: टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने ‘शुभ शक्ती’ ही खास महिलांसाठी डिझाइन केलेली टर्म इन्शुरन्स योजना सुरू केल्याची घोषणा केली आहे. ही फक्त एक जीवन विमा योजना नसून, प्रत्येक महिलेच्या जीवनातील विविध टप्पे व आर्थिक गरजांशी सुसंगत अशी एक सर्वांगीण संरक्षण योजना आहे. त्यायोगे ती वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात भरभराट करत स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम होऊ शकते.
पारंपरिकदृष्ट्या, टर्म लाईफ इन्शुरन्स उद्योग पुरुष-केंद्रित पद्धतीने डिझाइन केला गेला आहे. मुख्यत्वे घरातील कर्त्या पुरुषांच्या गरजांवर अधिक भर देण्यात आला आहे आणि महिलांच्या विशेष गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मात्र आज भारतीय महिला अडथळे पार करत आहेत आणि कामाच्या ठिकाणी नेतृत्व करीत आहेत, उद्योजक होत आहेत आणि आर्थिक निर्णय घेणाऱ्या बनत आहेत. आर्थिक वर्ष 18 मधील 23.3% वरून आर्थिक वर्ष 24 मध्ये महिला कामगार सहभाग दर 41.7% असा वाढलेला आहे. याचा अर्थ महिलांनी केवळ आर्थिक योगदानच दिले नाही, तर त्यांच्या आर्थिक भविष्याची सुरक्षितता देखील सुनिश्चित केली आहे.
तथापि, जरी महिला आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने प्रगती करत असल्या, तरी टाटा एआयएच्या एका अलीकडील सर्वेक्षणात आढळले की, 89% विवाहित महिला आजही आर्थिक नियोजनासाठी त्यांच्या पतीवर अवलंबून आहेत. केवळ 44% महिला पर्याय उपलब्ध असला तर स्वतंत्रपणे आर्थिक निर्णय घेतात.
ही दरी दर्शवते की महिलांच्या विशिष्ट आर्थिक गरजा व अडचणी लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या उपायांची अत्यंत तातडीने आवश्यकता आहे. या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता परिस्थितीत बदल होत आहे. डिसेंबर 2024 मध्ये 2.7 कोटी महिलांनी त्यांचे क्रेडिट स्कोअर ट्रॅक केले. केवळ एका वर्षात यात 42% वाढ झाली असून त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याबाबत जागरूकतेत वाढ दिसून आली आहे.
‘शुभ शक्ती’ — महिलांच्या सामर्थ्याचा उत्सव
“भारतीय महिला जरी स्वत:च्या आर्थिक गुंतवणूक व नियोजनाची जबाबदारी घेत असल्या तरी अजूनही त्यांना विमा संरक्षण खूपच कमी आहे. त्यामुळे आपत्तीच्या वेळी त्यांचे कुटुंब असुरक्षित राहते,” असे टाटा एआयएच्या चीफ कमप्लायन्स ऑफिसर गायत्री नाथन यांनी सांगितले. “शुभ शक्तीच्या माध्यमातून आम्ही अशा उपायांची निर्मिती करत आहोत जी आजच्या महिलांच्या ताकदीशी सुसंगत आहे. स्त्री ला तिच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे, तिच्या आरोग्यात गुंतवणूक करणे आणि चिंतेपासून मुक्त जीवन जगण्यास मदत करणे हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. तिच्या आकांक्षांना पाठबळ देणे, मानसिक शांती प्रदान करणे आणि तिच्या प्रियजनांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता ती जीवनाच्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊ शकेल एवढं तिला सक्षम करणे हेच आमचे ध्येय आहे.”
शुभ शक्ती: तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संरक्षण देणारी योजना
महिलांच्या गरजा बहुविध असतात हे लक्षात घेऊन, टाटा एआयए शुभ शक्ती ही योजना लवचिक, सर्वसमावेशक आणि आई, मुलगी, जोडीदार आणि व्यावसायिक अशा महिलांच्या आयुष्यातील विविध भूमिकांमध्ये त्यांच्या सोबत देण्याची खात्री देते.
महिला-केंद्रित लाभ:
· गर्भावस्थेदरम्यान प्रीमियम मध्ये सुट – प्रत्येक प्रसूतीनंतर 12 महिन्यांसाठी दोन वेळा प्रीमियम ब्रेक्स. यामुळे कोणताही आर्थिक बोजा न घेता स्त्रीयांना त्यांच्या आरोग्य आणि बाळाकडे लक्ष देणे शक्य होईल.
· महिलांसाठी प्रीमियम दर सुमारे 15% कमी — संपूर्ण प्रीमियम पेयिग टर्म (PPT) दरम्यान दरवर्षी लागू.
· आधीच्या 15% सूट व्यतिरिक्त सिंगल मदर्ससाठी अतिरिक्त 1% कायमस्वरूपी प्रीमियम सवलत
तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खास आरोग्य लाभ:
· पीसीओडी सपोर्ट, आयव्हीएफ विषयक सल्लासेवा, वजन व्यवस्थापन यांसह महिलांकेंद्रित खास वैद्यकीय सेवा सुविधा
· गर्भाशय मुखाचा कर्करोग, HPV, फ्लू इ. लसिकरणासाठी सहाय्य
· तज्ञ डॉक्टर सल्ला, वार्षिक आरोग्य तपासणी आणि जीवनशैलीशी निगडित आरोग्य व्यवस्थापन
मुलांच्या शिक्षणासाठीचे संरक्षण
· तुमच्या मुलांचे स्वप्न कधीही थांबता कामा नये. आयुष्यात कितीही संकट आली तरी मुलांच्या शिक्षणावर कोणत्याही संकटाचा परिणाम होणार नाही हे सुनिश्चित करत 3 मुलांपर्यंत वय 25 वर्षांपर्यंत मासिक उत्पन्न
· नवऱ्याचा मृत्यू किंवा अपघाती मृत्यू झाल्यास प्रीमियम माफ – अनपेक्षित घटनेमध्ये कोणताही प्रीमियम न भरता योजना पुढे सुरू राहते. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक संरक्षण अबाधित राहते.
टाटा एआयए हेल्थ बडी — याचे कारण निरोगी जीवनाचे बक्षीस मिळायलाच हवे
निरोगी, स्वास्थ्यपूर्ण, तणावमुक्त जीवनाच्या प्रवासाला योग्य आधाराची गरज असते. टाटा एआयए हेल्थ बडी हा शुभ शक्तीचा एक अविभाज्य भाग असून महिलांसाठी सर्वसमावेशक व प्रोत्साहनात्मक वेलनेस प्लॅन सादर करतो. शुभ शक्ती आणि हेल्थ बडी मिळून आरोग्य आणि संपत्ती दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी समग्र उपाययोजना सादर करतात.
· निरोगी जीवनाचे बक्षीस: नियमित आरोग्य तपासणी व फिटनेस लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल बक्षिसे
· कुटुंबासाठी आरोग्य आणि वेलनेस लाभ: संपूर्ण कुटुंब निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवलग लोकांकरता आरोग्य लाभ
· Lifestyle Nudges: वैयक्तिक आहार सल्ला, अॅक्टीव्हीटी लक्ष्य, फिटनेससाठी बक्षिसे
· परवडणारी योजना: महिलांसाठी 15% प्रीमियम सूट, डिजिटल खरेदी आणि सॅलराइड प्रोफाइलवर अतिरिक्त अशी कायमस्वरूपी सूट
बना तुमच्या कुटुंबाची ‘शुभ शक्ती’
टाटा एआयए शुभ शक्ती ही केवळ जीवन विमा योजना नाही. ती महिलांना सामर्थ्य, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता देत सक्षम बनवणारी योजना आहे. ही योजना महिलांचे आरोग्य, कुटुंबाचे संरक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर देत सर्वांगीण उपाय सुविधा पुरवते. शुभ शक्तीच्या साहाय्याने, तुम्ही स्वप्न पाहू शकता, आत्मविश्वासाने जगू शकता आणि तुमच्या कुटुंबाला एका सुरक्षित, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र भविष्यात घेऊन जाऊ शकता.
कारण कणखर, सक्षम महिलेला तिच्याइतकंच कणखर आणि सक्षम संरक्षण मिळायलाच हवं.

