केएफआयएलने आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीचे वित्तीय निकाल केले जाहीर
स्टँडअलोन महसूल ₹1,685 कोटी असून, वर्षभरात 8% ने वाढ;
तर स्टँडअलोन निव्वळ नफा ₹96 कोटी असून, त्यात 27% वाढ.
पुणे, भारत – 4 ऑगस्ट 2025: किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड (BSE: 500245), ही भारतातील आघाडीची कास्टिंग्ज व पिग आयर्न उत्पादक कंपनी असून, स्टील व सिमलेस ट्यूब्स क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावते. कंपनीने आज आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीसाठीचे अलेखापरीक्षित वित्तीय निकाल जाहीर केले.
आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीच्या निकालांवर भाष्य करताना केएफआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आर. व्ही. गुमास्ते म्हणाले, “आर्थिक वर्ष 2026 ची पहिली तिमाही ही केएफआयएलसाठी चांगली सुरुवात ठरली आहे. स्वतंत्र महसूल 8% ने वाढून ₹1,685 कोटी झाला असून, निव्वळ नफा 27% ने वाढून ₹96 कोटी झाला आहे. ट्रॅक्टर, लोखंड आणि स्टील क्षेत्रातील मागणीत झालेली सुधारणा, सकारात्मक बाजार भावना आणि पुरवठा साखळीतील अडथळे कमी होणे यामुळे हा परिणाम साधता आला आहे. या तिमाहीत आम्ही आमच्या संपूर्ण मालकीच्या दोन उपकंपन्या — ऑलिव्हर इंजिनिअरिंग आणि अॅडिका एनर्जी सोल्युशन्स — यांचे केएफआयएलमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे आमची रचना सुलभ होईल व कार्यक्षमतेत वाढ होईल. याशिवाय, कर्नाटकातील जंबुनाथा लोहखनिज खाणीसाठी इलेक्ट्रॉनिक लिलावात आम्हाला प्राधान्यक्रमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले, हा आमच्या कच्च्या मालाच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे सर्व घडामोडी आमच्या दीर्घकालीन मूल्यनिर्मिती, कार्यदक्षता आणि शाश्वत वाढीसाठी असलेल्या कटिबद्धतेला बळकटी देतात.”
आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीच्या स्टँडअलोन कामगिरीचा आढावा :
● ऑपरेशन्समधून महसूल: आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹1,685.1 कोटी, तर आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹1,553.7 कोटी – वार्षिक आधारावर 8% वाढ
● ईबीआयटीडीए*: आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹213.9 कोटी, तर आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹187.4 कोटी – वार्षिक 14% वाढ
● ईबीआयटीडीए* मार्जिन: आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 12.7%, तर आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 12.1% होते.
● करपूर्व नफा (PBT#): आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹130.4 कोटी, तर आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹104.3 कोटी – वार्षिक 25% वाढ
● करपश्चात नफा (PAT): आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹95.8 कोटी, तर आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹75.6 कोटी – वार्षिक 27% वाढ
आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये (संघटित) वित्तीय कामगिरीचा आढावा:
● ऑपरेशन्समधून महसूल : आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹1,698.1 कोटी, तर मागील वर्षी याच तिमाहीत ₹1,553.7 कोटी — वार्षिक 9% वाढ
● ईबीआयटीडीए*: आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹216.9 कोटी, तर मागील वर्षी ₹187.0 कोटी — वार्षिक 16% वाढ
● ईबीआयटीडीए* मार्जिन: आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 12.8%, तर मागील वर्षी 12.0%
● करपूर्व नफा (PBT#): आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹127.2 कोटी, तर मागील वर्षी ₹98.5 कोटी — वार्षिक आधारावर 29% वाढ
● करपश्चात नफा (PAT): आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹95.1 कोटी, तर मागील वर्षी ₹69.7 कोटी — वार्षिक 36% वाढ

