पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला रविवार, दि. 10 ऑगस्ट रोजी प्रारंभ होणार आहे. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च ‘सत्यं शोधं सुंदरम्’ या एकांकिकेने हीरक महोत्सवी वर्षातील स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
स्पर्धा दि. 10 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीत भरत नाट्य मंदिरात होणार आहे. स्पर्धेसाठी 51 संघांनी प्रवेश निश्चित केला असून स्पर्धेचे लॉटस् आज (दि. 4 ऑगस्ट) शनिवार पेठेतील सुदर्शन रंगमंच येथे विद्यार्थी प्रतिनिधींच्या उपस्थितीत काढण्यात आले. स्पर्धेसंदर्भातील नियमावली स्पर्धक संघांना सुरुवातीस समजावून सांगण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी स्पर्धकांच्या हस्ते चिठ्ठ््या काढून लॉटस् निश्चित करण्यात आले.
स्पर्धा दि. 10, दि. 17 आणि दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 9 अशा दोन सत्रात होणार असून दि. 11 ते 16 ऑगस्ट आणि दि. 18 ते 23 ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी 5 ते 9 या वेळात होणार आहे.

