Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्रात 89,780 कोटी रुपये खर्चाचे 38 रेल्वे प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर

Date:

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांची वेगवान प्रगती

नवी दिल्ली/मुंबई

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांची प्रगती वेगाने सुरु असून कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राज्य सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे. तत्कालीन राज्य सरकारच्या धोरणांमुळे 2019 ते  2022  दरम्यान अनेक रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे काम रखडले होते. याचा रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांवर, विशेषतः अतिजलद कॉरिडॉरवर मोठा परिणाम झाला. मात्र 2022 पासून, महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी चांगला पाठिंबा मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या चार रेल्वे विभागांच्या अखत्यारीत येते. या विभागांसाठी 2025–26 आर्थिक वर्षासाठी  3,751 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत 813 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प

मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी, 8,087 कोटी रुपये खर्चाचा मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी )-II, 10,947 कोटी रुपये खर्चाचा एमयूटीपी -III आणि 33,690 कोटी रुपये खर्चाचा एमयूटीपी -IIIA मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पांमध्ये मुंबई उपनगरीय क्षेत्रातील खालील कामांचा समावेश आहे :

अनु . क्र.प्रकल्पाचे नावखर्च (कोटीरुपये )
1मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी मार्गिका (30 किमी)919
2गोरेगाव-बोरिवली  हार्बर मार्गाचा विस्तार (7 किमी)826
3विरार-डहाणू रोड तिसरी व चौथी मार्गिका (64 किमी)3587
4सीएसटीएम-कुर्ला  पाचवी व सहावी मार्गिका (17.5 किमी)891
5पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर (29.6 किमी)2782
6ऐरोली-कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक (3.3 किमी)476
7बोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका (26 किमी)2184
8कल्याण-आसनगाव दरम्यान चौथी मार्गिका (32 किमी)1759
9कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका (14.05 किमी)1510
10कल्याण यार्ड-मेन लाइन व उपनगरीय मार्गीकेचे विलगीकरण866
11नायगाव ते जुचंद्र दरम्यान (दुहेरी मार्ग) वसई बायपास लाइन (5.73   किमी)176
12अतिक्रमण नियंत्रण (34 ठिकाणे )551

याशिवाय, 1 एप्रिल 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्यात 89,780 कोटी रुपयांचे एकूण 5,098 किमी लांबीचे 38 रेल्वे प्रकल्प पूर्णपणे/अंशतः नियोजन आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत, त्यापैकी 2,360 किमी लांबीचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत आणि मार्च 2025 पर्यंत 39,407 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

कामाची सद्यःस्थिती पुढील प्रमाणे:

श्रेणीप्रकल्पांची संख्याएकूण लांबी (कि.मी.)कार्यान्वित मार्गिका  (कि.मी.)मार्च 2025 पर्यंतचा खर्च  (कोटी रु.)
नवीन मार्गिका111,35523410,504
गेज रूपांतरण 2  609334  4,286
दुहेरीकरण/ मल्टीट्रॅकिंग         25      3,134         1,79224,617
एकूण         38      5,098         2,360            39,407

2009-14 आणि 2014-25 दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या पूर्णतः/अंशतः अखत्यारीत येणारे कार्यान्वित (नवीन मार्गगेज रूपांतरण आणि दुहेरीकरणकरण्यात आलेले विभाग

कालखंडनवीन मार्गिका कार्यान्वितनवीन मार्गिका कार्यान्वित होण्याची सरासरी आकडेवारी  
2009-14292 की.मी.58.4 कि.मी. / वर्ष
2014-252,292 कि.मी. (8 वेळा)208.36 किमी / वर्ष (3.5 पट पेक्षा जास्त)

महाराष्ट्रात पूर्णतः/अंशतः येणारे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि इतर कामांसाठी सरासरी अर्थसंकल्पीय तरतूद पुढील प्रमाणे:

कालखंडखर्च
2009-14₹ 1,171 कोटी/वर्ष
2025-26₹ 23,778 कोटी (20 पटीहून अधिक)

महाराष्ट्रात पूर्णतः/अंशतः येणाऱ्या नुकत्याच पूर्ण झालेल्या काही प्रकल्पांचे तपशील पुढील प्रमाणे:

अनु क्र.प्रकल्पखर्च (₹ कोटी)
1जबलपूरगोंदिया गेज रूपांतरण (300 किमी)2005
2छिंदवाडानागपूर गेज रूपांतरण (150 किमी)1512
3पनवेलपेण दुहेरीकरण (35 किमी)263
4पनवेलरोहा दुहेरीकरण (75 किमी)31
5पेण-रोहा दुहेरीकरण (40 किमी)330
6उधनाजळगाव दुहेरीकरण (307 किमी)2448
7मुदखेडपरभणी दुहेरीकरण (81 किमी)673
8भुसावळ – जळगाव तिसरी मार्गिका (24 किमी)325
9जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका (24 किमी)261
10दौंडगुलबर्गा दुहेरीकरण (225 किमी)3182

महाराष्ट्रात पूर्णतः/अंशतः येणारे हाती घेतलेले काही मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प पुढील प्रमाणे:

अनु क्र.प्रकल्पाचे नावखर्च (₹ कोटी)
1अहमदनगरबीडपरळी वैजनाथ नवीन मार्गिका (261 किमी.)4,957
2बारामतीलोणंद नवीन मार्गिका (64 किमी.)1,844
3वर्धानांदेड नवीन मार्गिका (284 किमी.)3,445
4धुळे (बोरविहीर)-नरडाणा नवीन मार्गिका (51  किमी.)1,171
5मनमाड-इंदूर नवीन मार्गिका (309 किमी.)16,321
6वडसागडचिरोली नवीन मार्गिका (52 किमी.)1,886
7जालना-जळगाव नवीन मार्गिका (174 किमी.)5,804
8पुणे-मिरज-लोंडा दुहेरीकरण (466 किमी.)6,463
9दौंड मनमाड दुहेरीकरण (236 किमी.)30,376
10मुदखेड – मेडचाळ आणि महबूबनगर – ढोणे विभाग दुहेरीकरण (417 किमी.)4,686
11होटगीकुडगीगदग दुहेरीकरण (284 किमी.)2,459
12 कल्याणकसारा – तिसरी मार्गिका (68 किमी.)1,433
13वर्धानागपूर तिसरी मार्गिका (76 किमी.)698
14वर्धाबल्लारशाह तिसरी मार्गिका (132 किमी.)1,385
15इटारसीनागपूर तिसरी मार्गिका (280 किमी.)2,450
16मनमाड जळगाव तिसरी मार्गिका (160 किमी.)1,677
17काझीपेटबल्लारशाह – तिसरी मार्गिका (202 किमी.)3,183
18राजनांदगाव-नागपूर तिसरी मार्गिका (228 किमी.)3,545
19वर्धानागपूर चौथी मार्गिका (79 किमी.)1,137
20जळगाव-मनमाड चौथी मार्गिका (160 किमी. 

याव्यतिरिक्त, मागील तीन आर्थिक वर्षांत, म्हणजेच 2022-23, 2023-24 आणि 2024-25 तसेच चालू आर्थिक वर्षात, महाराष्ट्रातील पूर्णतः /अंशतः एकूण 7979 किमी लांबीच्या 94 सर्वेक्षणांना (26 नवीन मार्ग, 2 गेज परिवर्तन आणि 66 दुहेरीकरण) प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.

मागील तीन आर्थिक वर्षांत, म्हणजेच 2022-23, 2023-24 आणि 2024-25 तसेच चालू आर्थिक वर्षात, महाराष्ट्रातील पूर्णतः /अंशतः एकूण 7979 किमी लांबीच्या 94 सर्वेक्षणांना (26 नवीन मार्ग, 2 गेज परिवर्तन आणि 66 दुहेरीकरण) प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. काही महत्त्वाची सर्वेक्षणे खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत :

यामध्ये मराठवाडा विभागातील प्रकल्पांचाही समावेश आहे. काही महत्त्वाची सर्वेक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

अ.क्र.प्रकल्पाचे नावलांबी (किलोमीटरमध्ये)
1उस्मानाबाद-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन मार्ग240
2छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव नवीन मार्ग 93
3बोधन-लातूर नवीन मार्ग135
4कलबुर्गी-लातूर नवीन मार्ग139
5लातूर-नांदेड नवीन मार्ग 104
6जालना-खामगाव नवीन मार्ग155
7छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरीकरण 177

महाराष्ट्रातील स्थानकांचा विकास

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत एकूण 1337 स्थानकांपैकी महाराष्ट्रातील 132 स्थानके विकासासाठी निश्चित करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 15 अमृत भारत स्थानकांच्या (आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाष चंद्र बोस इटवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड, वडाळा रोड) पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. अमृत भारत स्थानक योजनेसह सर्व स्थानकांचा विकास, अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरण हे साधारणपणे ‘प्लॅन हेड-53 – कस्टमर ॲमेनिटीज’ अंतर्गत निधीतून केले जाते. या प्लॅन हेड-53 अंतर्गत निधीचे वाटप आणि खर्चाचा तपशील विभागवार ठेवला जातो, तो कामनिहाय, स्थानकनिहाय किंवा राज्यनिहाय ठेवला जात नाही.

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रात विकासासाठी निश्चित करण्यात आलेल्या स्थानकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

अहमदनगर,अजनी (नागपूर), अक्कलकोट रोड, अकोला, आकुर्डी, अमलनेर, आमगाव, अमरावती, अंधेरी, बडनेरा, बल्लारशाह, बांद्रा टर्मिनस, बारामती, बेलापूर, भंडारा रोड, भोकर, भुसावळ, बोरिवली, बायकुला,चाळीसगाव, चांदा फोर्ट, चंद्रपूर, चर्नी रोड, छत्रपती संभाजी नगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चिंचपोकळी, चिंचवड, दादर (मध्य रेल्वे), दादर (पश्चिम रेल्वे), दहिसर, दौंड, देहू रोड, देवळाली, धामणगाव, धारंगगाव, धाराशिव, धर्माबाद, धुळे, दिवा, दुधनी, गंगाखेड, गोधनी, गोंदिया, ग्रँट रोड, हडपसर, हातकणंगले, हजर साहिब नांदेड, हिमायतनगर, हिंगणघाट, हिंगोली डेक्कन, इगतपुरी, जळगाव, जालना, जेऊर, जोगेश्वरी, कल्याण जंक्शन, कामठी, कांदिवली, कांजूर मार्ग, कराड, काटोल, केडगाव, किनवट, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, कुर्ला जंक्शन, लासलगाव, लातूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणंद जंक्शन, लोणावळा, लोअर परळ, मालाड, मलकापूर, मनमाड जंक्शन, मानवत रोड, मरीन लाईन्स, माटुंगा, मिरज जंक्शन, मुदखेड जंक्शन, मुंबई सेंट्रल, मुंब्रा, मूर्तिजापूर जंक्शन, नागरसोल, नागपूर जंक्शन, नांदगाव, नांदुरा, नंदुरबार, नरखेड जंक्शन, नाशिक रोड, नेताजी सुभाष चंद्र बोस इटवारी जंक्शन, पाचोरा जंक्शन, पालघर, पंढरपूर, पनवेल जंक्शन, परभणी जंक्शन, परळ, परळी वैजनाथ, परतूर, फलटण, प्रभादेवी, पुलगाव जंक्शन, पुणे जंक्शन, पूर्णा जंक्शन, रावेर, रोटेगाव, साईनगर शिर्डी, सँडहर्स्ट रोड, सांगली, सातारा, सावदा, सेलू, सेवाग्राम, शहाड, शेगाव, शिवाजी नगर पुणे, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर, सोलापूर, ताळेगाव, ठाकुरली, ठाणे, टिटवाळा, तुमसर रोड, उमरी, उरळी, वडाळा रोड, विद्याविहार, विक्रोळी, वडसा, वर्धा, वाशिम, वठार

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत संजय राऊत यांनी विचारलेल्या एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेहरू,इंदिराजी,राजीव आणि सोनिया गांधीना व्होट चोरीप्रकरणी अमित शहांनी केले लक्ष….(व्हिडीओ)

कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी अखेरीस केला सभात्याग .. नवी दिल्ली-...

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...