पुणे- रविवार पेठेतील सराफी दुकानात झालेल्या चोरीत दुकानातील कामगार आणि सांगलीच्या त्यांच्या कुटुंबाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून फरासखाना पोलिसांनी त्यांन अटक केली आहे.
दिनांक ३१/१२/२०२३ रोजी रात्री ०८.०० वाजता ते दिनांक ०१/०१/२०२४ रोजीचे सकाळी १०,०० याजेचे दरम्यान फिर्यादी नामे दिपक माने याचे ७९७ रविवार पेठ पुणे येथील राज कास्टींग नावाचे दुकान कुलूप लावुन बंद असतांना त्याचे दुकानामध्ये सध्या कामासाठी असलेले कामगार किंवा पुर्वी काम करत असलेल्या कामगारांपैकी कोणीतरी फिर्यादी यांचे दुकानाची व तिजोरीची बनावट चावी बनवून त्या चावीने दरवाजा उघडून दुकानामध्ये प्रवेश करुन दुकानामधील लोखंडी तिजोरी बनावट चावीने उघडून त्यामध्ये ठेवलेले एकुण ३कोटी ३२लाख ०९हजार २२८रुपयांचे ५ किलो ३२३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व १०,९३,२६०/- रुपये रोख रक्कम फिर्यादी यांचे संमतीशिवाय चोरुन नेले बाबत दिलेल्या फिर्याद वरून फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ०३/२०२४ भादवि कलम ३८१ प्रमाणे दिनांक ०१/०१/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये फिर्यादीच्या दुकानातील कामगार नामे सुनिल कोकरे हा त्याची आजी वारल्याचे सांगुन त्याच्या गावाकडे दोन दिवसा पूर्वी गेल्याचे समजले होते. परंतु तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे निष्पन्न झाले की, सदर कामगार हा दोन दिवसांपासुन पुणे मध्ये असल्याचे व घटनेच्या वेळी घटनास्थळावर असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी सुनिल कोकरे याच्या सोबत पुणे येथे राहणारा त्याचा मित्र अनिल गारळे हा सुद्धा पुणे सोडुन बाहेर गावी गेल्याचे समजले. या अनुषांगाने फरासखाना पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व स्टाफ असे जत सांगली येथे तपासाकरता रवाना झाले. या पथकाने यातील मुख्य आरोपी सुनिल खंडु कोकरे व त्याचा साथीदार सिध्देश्वर ऊर्फ तानाजी राजाराम खांडेकर यास त्याच्या घरी कारंडेवाडी, ता-जत, जि-सांगली येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्हयाबाबत तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. सदरची चोरी त्याचे साथीदार अनिल गारळे व तानाजी खांडेकर यांच्या मदतीने केले असल्याचे सांगितले. परंतु गुन्हयातील मुद्देमाल हा त्यांचा त्यांचा दुसर साथीदार अनिल गारळे याच्याकडे असल्याचे सांगुन तो सध्या कोल्हापुर येथे असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व पोलीस अंमलदार गणेश दळवी व प्रमोद मोहीते यांनी सदर आरोपींना ताब्यात घेऊन कोल्हापुर येथे गेले असता तेथे गुन्हे शाखा युनिट १, पुणे शहर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अशिष कवठेकर व स्टाफ यांनी यातील आरोपी अनिल गारळे यास ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन्ही पथकानी ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींकडे विश्वासात घेऊन तपास करता त्यांनी चोरलेला मुद्देमाल हा सुनिल कोकरे याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यामुळे सदर आरोपींना घेऊन दोन्ही पथके सुनिल कोकरे याच्या घरी कारंडेवाडी, ता-जत, जि- सांगली येथे आले असता आरोपी सुनिल कोकरे याने चोरी केलेले सोने व रोख रक्कम घरा जवळील शेतातील हत्ती घासमध्ये लपवले असल्याचे सांगितल्याने तेथे पोलीसांनी आरोपीच्या शेतामधुन २ किलो ९८३ग्रॅम ५ मिलीग्रॅम सोने व ७,७३,०७०/- रुपये रोख रक्कम जप्त केली.
सदर आरोपींना या चोरीत दिनांक ०२/०१/२०२४ रोजी अटक करण्यात आली. अटक आरोपींची पोलीस कस्टडी घेवुन त्यांच्याकडे उर्वरीत सोने व रोख रक्कम बाबत तपास करता ते काही एक उपयुक्त माहिती देत नसल्याने फरासखाना पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक, वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व पोलीस अंमलदार प्रमोद मोहीते, मल्लीकार्जुन स्वामी, संदीप कांबळे यांनी आरोपी सुनिल खंडू कोकरे याचे मुळ गावी जावुन त्याच्या घराची व शेताची झडती घेतली असता झडतीमध्ये ४९७ ग्रॅम सोने व १,५०,०००/- रुपये रोख रक्कम शेतामध्ये लपवुन ठेवल्याचे मिळुन आल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहेत. हा मुद्देमाल हा आरोपी सुनिल कोकरे यांची आई राजश्री खंडु कोकरे, भाऊ अनिल खंडु कोकरे, नवनाथ खंडु कोकरे यांनी संगणमत करुन लपवुन ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात भा.दं.वि कलम ४१४ प्रमाणे कलम वाढ करुन राजश्री कोकरे, अनिल कोकरे, नवनाथ कोकरे यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडे दाखल गुन्हयातील उर्वरीत सोने व रोख रक्कमे बाबत काहिएक उपयुक्त माहिती देत नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व पोलीस अंमलदारमोहीते, वैभव स्वामी, प्रविण पासलकर, निर्मला शिंदे यांनी आरोपींना घेऊन त्यांच्या मुळ गावी जावुन बी.डी.डी.एस सांगली ग्रामिण व श्वान पथकसांगली ग्रामिण, डी.एस.एम.डीचे मदतीने आरोपीच्या घराची व घरा लगतचे शेतात शोध घेतला असता शेतातील एका पीव्हीसी पाईप मध्ये आरोपीने रोख रक्कम ५०,०००/- रुपये लपवुन ठेवलेली मिळुन आल्याने ती जप्त करण्यात आली आहे.अशाप्रकारे दाखल गुन्हयाचे तपासात आरोपींकडुन एकुण ३ किलो ४८० ग्रॅम ५ मिलीग्रॅम सोने व ९.७३.०७०/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत, दाखल गुन्हयाचा अधिक तपास वैभव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त (अति.कार्य.) श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री प्रविण पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे, श्री संदीप सिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री. अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.दादासाहेब चुडाप्पा, श्री. शब्बीर सय्यद, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट १. पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री मंगेश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वैभव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री अशिष कवटेकर, गुन्हे शाखा युनिट १, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मेहबुब मोकाशी, निर्मला शिंदे, प्रमोद मोहिते, गणेश दळवी, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे, पंकज देशमुख, तुषार खडके, अजित शिंदे, शशीकांत ननावरे यांच्या पथकाने केली आहे.

