दुदैव्यांच्या वस्तीला सुधारगृहांच्या दिशेवर ठेवण्याची गरज .. महादेव गोविंद नरवणे या महानिरीक्षक अधिकाऱ्यांच्या समवेत काम केलेल्या स्वाती साठे यांनी आपल्या कारकिर्दीत ..’उत्तुंग भिंतींच्या मागे , लोखंडी शिगांच्या आत .. आमची दुदैव्यांची वस्ती आम्ही काय करावे जगती ‘ या नरवणे यांच्या काव्य ओळी जागवत हि दुदैव्यांची वस्ती सुधारगृहांच्या दिशेवर ठेवण्याचा आपण आपल्या कार्कीडीत सातत्याने प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. सॅटेलाईट चानेल येण्यापुर्वीच ज्येष्ठ पत्रकार शरद लोणकर यांनी नरवणे यांच्या संमतीने येरवडा कारागृहातील पुरुष आणि महिला कैद्यांचे जीवनमान ‘पुणे दर्शन’ या स्थानिक केबल वाहिनी द्वारे दाखविले होते आणि कैद्यांच्या व्यथा आणि कथा लोकांपुढे काही मालिकांमधून आणल्या होत्या . आईच्या पोटातून कोणी गुन्हेगार बनून येत नाही , आजूबाजूची परिस्थिती , सामाजिक अवस्था त्यास कारणीभूत ठरतात . माणूस म्हणून येथे आलेल्या कैद्याला हि शिक्षगृहे न वाटता सुधारगृहे वाटली पाहिजेत हा दृष्टीकोन ठेवल्याचा दाखला तेव्हाही या मालिकेने दिला होता .
पुणे-“महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून दिनांक ३१.०७.२०२५ रोजी कारागृह विभागातील सेवा निवृत्त होणाऱ्या प्रथम महिला विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती स्वाती मृणालिणी माधव साठे यांचा भव्य सेवापूर्तीचा सत्कार समारंभ दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, के. के. भवन हॉल, येरवडा, पुणे येथे संपन्न झाला .
सेवानिवृत्तीच्या समारंभामध्ये सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या हस्ते विशेष कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे. या प्रसंगी सुहास वारके यांना मनोगत व्यक्त करताना शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या श्रीमती स्वाती साठे, विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी चांगल्या प्रकारे सेवा केली व त्याच बरोबर पोलीस व कारागृह सेवेसारख्या ताणतणावाचे सेवेमध्ये आरोग्य चांगल्या प्रकारे राखून काम केले याचे कौतुक केले. तसेच यापुढे देखील त्यांचे आरोग्य चांगले राहो व त्यांची वैयक्तिक ईच्छा पूर्ण होवो अशा शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्तीच्या समारंभास उपस्थित असणारे कारागृह विभागातील योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण व पूर्व विभाग व कारागृहातील सर्व अधीक्षक यांनी देखील स्वाती साठे यांचे बरोबर एकत्रित केलेल्या कर्तव्याच्या गतकाळातील चांगल्या प्रसंगाच्या आठवणी सांगून उपस्थितांना आवाहन केले. या समारंभात प्राचार्य नितीन वायचळ, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे यांचे सह महाराष्ट्र कारागृहातील इतर कारागृह अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन सत्यवान हिंगमिरे, वरिष्ठ प्रशासन अधिकारी, मुख्यालय, पुणे व रजनी मोटके यांनी केले.”

