पुणे- वय अवघे २० ते २४ अन त्यांच्यावर चोऱ्या घरफोड्यांचे तब्बल २९ गुन्हे दाखल अशा ३ सराईत आरोपींना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि, दिनांक २५/०६/२०२५ रोजी अज्ञात आरोपीनी फिर्यादी यांचे बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून घरातील ४,५७,६९८/-रु. रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी केले बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४३/२०२५ भा.न्या.सं.क. ३३१ (३),३०५ (अ), ३ (५) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल आहेसदर गुन्हयाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच पुणे शहर परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन दाखल गुन्हयातील चोरट्या इसमांचा मागोवा काढत घरफोडी करणाऱ्या इसमांपर्यत पोहचुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता आरोपींनी त्यांची नावे १) रोहीत उर्फ विनायक प्रमोद भोंडे वय-२१ वर्षे रा. लक्ष्मीनगर, सर्व्हे १२ तिरंगा मित्र मंडळ, भोलेनाथ मंदीर शेजारी, येरवडा पुणे २) रोहीत उर्फ रावन नानाभाऊ लंके वय-२४ वर्षे रा. कस्तुरबा हाऊसिंग सोसायटी अनिरूध्द अपार्टमेन्ट प्लॅट नं.०१ विश्रांतवाडी पुणे. ३) निखील परशुराम खांडेकर वय-२० वर्षे रा. लक्ष्मीनगर सर्व्हे १२ तिरंगा मित्र मंडळ भोलेनाथ मंदीर शेजारी येरवडा पुणे असे सांगुन त्यांनी दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना दिनांक २४/०७/२०२५ रोजी दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेल्या रोख रक्कमेपैकी १०,०००/-रू रोख रक्कम तसेच दाखल गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन व हत्यार जप्त करण्यात आले असुन दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.
अटक आरोपींबाबत आधिक माहिती काढली असता सदर आरोपीवर पुणे शहर परीसरात चोरी, घरफोडी, शरीराविरुध्दचे अपराध यासारखे २९ गंभीर गुन्हे दाखल असुन अटक आरोपी नामे रोहीत नानाभाऊ लंके यास दि.०३/०५/२०२४ रोजी पोलीस उप आयुक्त परिमडंळ-०४ यांनी तडीपार आदेश क्र.२७/२०२४ नुसार मुंबई पोलीस अधिनियम कलम-५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर, पुणे जिल्हा व पिंपरी चिचंवड हद्दीतुन ०२ वर्षाकरीता तडीपार केले असताना देखील सदर आरोपीने तडीपार आदेशाचा भंग करून पुणे शहरात प्रवेश करून सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०१ रुषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे),. चेतन मोरे यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार, औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.

