पुणे-पुण्यात एका जोडप्याचे चक्क सार्वजनिक रस्त्यावर प्रेम प्रदर्शन करत वाहतूक नियमांना आणि सामाजिक संकेतांना धाब्यावर बसवले. या तरुण-तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खेड शिवापूरजवळील शिंदेवाडी परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकी चालवत आहे आणि त्याच्या पेट्रोल टँकवर एक तरुणी उलटी बसलेली दिसते. विशेष म्हणजे, ती तरुणी धावत्या दुचाकीवर तरुणाला मिठी मारताना, जवळीक साधताना स्पष्टपणे दिसते. या धक्कादायक प्रकाराकडे आसपासचे अनेकजण आश्चर्याने पाहत होते, तर काहींनी आपापल्या मोबाईलमध्ये या दृश्याचे चित्रीकरणही केले. पण या प्रेमीयुगलाला ना इतरांची पर्वा होती, ना वाहतुकीच्या नियमांची फिकीर.
तरुणीने स्कार्फने चेहरा झाकलेला असला तरी तिचे आणि दुचाकीस्वाराचे वर्तन अत्यंत बिनधास्त होते. रस्त्यावर वाहनांचा वेग असतानाही त्यांनी अशा पद्धतीने प्रेमाचे प्रदर्शन केल्याने ना फक्त अपघाताचा धोका वाढतो, तर इतर वाहनचालकांची एकाग्रताही भंग होते.या व्हिडिओमुळे समाज माध्यमांवर चांगलीच खळबळ उडाली आहे.अशा धोकादायक आणि बेजबाबदार वर्तनामुळे रस्त्यावरील इतर वाहनधारकांचे प्राणही संकटात येऊ शकतात, हे विसरून चालणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

