राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई,रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना फ्लॅटमधे पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमधे पार्टी सुरु होती. प्रांजल खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलीसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरांचे नाव या पार्टीत आल्याने अनेक राजकीय चर्चेला ऊत आला आहे.
पुणे-शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत पाच जणांना अटक केली आहे. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टीदरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिला, तीन पुरुषांचा समावेश असून, एकनाथ खडसेंच्या जावयाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. रॅडीसन हॉटेलच्या मागे असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बनसोडे नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या या गेस्ट हाऊसवर पोलिसांनी छापेमारी केली. त्यावेळी मोठ्या आवाजात संगीत सुरू होते आणि उपस्थित लोक अंमली पदार्थांचे सेवन करत होते. पोलिसांनी सर्वांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा स्रोत आणि पुरवठादार यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
या पार्टीत सहभागी झालेल्यांमध्ये एका महिला आमदाराच्या पतीचा आणि एकनाथ खडसेंच्या जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल केवळकर यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच, प्रसिद्ध बुकी निखिल पोपटानी याचेही नाव यात जोडले जात आहे, त्यामुळे या कारवाईने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

