मुंबई, 25 जुलै 2025 – वर्ल्ड नेचर काँझर्व्हेशन डेच्या निमित्ताने, सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड (“SCIL” किंवा “कंपनी”) ने एकत्रित पर्यावरण संवर्धन प्रकल्प यशस्वीपणे राबवून विविध ठिकाणी एकूण 1,847.25 हेक्टर क्षेत्र व्यापले असून, पाण्याचे स्रोत विकास, शाश्वत शेती व कचरा व्यवस्थापन यांद्वारे दीर्घकालीन पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम साधण्याचा कंपनीचा दृढ संकल्प अधोरेखित केला आहे.
सुदर्शनच्या जलसंवर्धन उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम झाले असून, योजनाबद्ध हस्तक्षेपातून विस्तृत क्षेत्रावर प्रभाव पडला आहे. एससीआयएलने 2,915 घनमीटर इतके नाला खोलीकरण पूर्ण केले असून, 8 गॅबियन रचना व 4 चेक डॅम्सचे बांधकाम केले आहे, ज्याचा 100 हेक्टरहून अधिक शेती क्षेत्रावर सकारात्मक परिणाम झाला आहे. सुखदरे कोंड आणि बौद्धवाडी येथील झऱ्यांचे पुनरुज्जीवन प्रकल्पांमुळे 250 लाभार्थ्यांना 24×7 स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा सहज वापर मिळत असून, टँकरची गरज पूर्णपणे टळली आहेत. यामुळे समुदायाचा खर्च वाचला असून, बाह्य पाणीस्रोतांवरील अवलंबित्वही कमी झाले आहे.
यासह 800 मीटर पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन आणि वॉटर फिल्टर्स स्थापन केल्यामुळे पाण्याच्या टंचाईच्या काळात व ऋतुपरत्वे होणाऱ्या बदलांमध्ये 100 हून अधिक घरांना लाभ मिळतो आहे, तसेच माती व पाणी संवर्धनासाठी 1,400 घनमीटर ‘कंटिन्युअस काँटूर ट्रेन्चेस’ (CCTs) राबविण्यात आले आहेत आणि 100 एकरहून अधिक जमीन शेती सुधारण्यासाठी प्रक्रियेत आणली गेली आहे.
सुदर्शनने रोहा, महाड आणि सुतारवाडी या भागांमध्ये 5,000 हून अधिक वृक्ष लागवड केली असून, यामध्ये आंबा, चिकू आणि फणस अशा स्थानिक हवामानात फुलणाऱ्या आणि बाजारात उच्च मागणी असलेल्या फळझाडांच्या 1,200 रोपांचा समावेश आहे. या प्रजातींची निवड त्यांच्या स्थानिक हवामानाशी सुसंगततेसाठी, फळ उत्पादनाच्या आर्थिक मूल्यासाठी आणि मातीच्या स्थिरीकरणासाठी करण्यात आली आहे.
याशिवाय, कंपनीने 120 हून अधिक किचन गार्डन्सची स्थापना केली असून, 150 एकर क्षेत्र जैविक शेतीसाठी रूपांतरित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक संधी उपलब्ध होत असून, उत्पन्नातील चढ-उतार व मातीची गुणवत्ता खालावणे यांसारख्या समस्यांवर प्रभावी उपाय मिळत आहे. वृक्षारोपण मोहिमेसाठी एकूण 75 कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदविला, ज्यामुळे संस्थेमध्ये पर्यावरणप्रेमी संस्कृती वृद्धिंगत झाली आहे.
सुदर्शनने रोहा आणि महाड येथे केंद्रीकृत कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केले आहेत. याबरोबरच 2,500 हून अधिक घरगुती कंपोस्ट प्लांटर्सचे वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक प्लांटर दररोज 1 किलो ओला किचन कचरा प्रक्रिया करतो आणि त्याला उपयुक्त सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित करतो, यामुळे घराच्या पातळीवर सर्क्युलर इकॉनॉमीचे उत्तम उदाहरण उभे राहत आहे.
कंपनीने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘नेचर क्लब्स’ची स्थापना केली असून, विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या आहेत. नियमितपणे नर्माल्य संकलन मोहिमा, जैवविविधता, कचरा व जलसंवर्धन विषयक जनजागृती अभियान यांद्वारे स्थानिक समुदायांमध्ये पर्यावरणपूरक वर्तनात्मक बदल घडवून आणले आहेत.
या विषयावर बोलताना शिवारिका राजे, प्रमुख – पीपल प्रॅक्टिसेस व चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर, सुदर्शन केमिकल्स म्हणाल्या, “खरे पर्यावरण संवर्धन तेव्हाच शक्य होते, जेव्हा निसर्ग रक्षणाचा भाग समुदाय सक्षमीकरणाशी जोडला जातो. सुदर्शनमध्ये आमचा विश्वास आहे की, नफा आणि उद्दिष्ट यांच्यात योग्य समतोल साधला, तर अशी शाश्वत उपाययोजना निर्माण होते, जी पर्यावरण व समाज दोघांच्याही हिताची ठरते. आम्ही आमच्या पर्यावरणीय परिणामांमध्ये सतत घट करण्यासाठी, संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत.”
सुदर्शन येत्या काळात लावण्यात आलेल्या रोपांची वाढ आणि टिकाव नियमितपणे तपासत राहणार आहे, तसेच दरवर्षी मूल्यांकन करून शेतकऱ्यांना मिळालेल्या फायदे व जैवविविधता, मातीची आरोग्यदशा व जलसंवर्धन अशा पर्यावरणीय सुधारणा यांचा आढावा घेत राहणार आहे.

