पुणे -महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या वतीने वाघोली ते हिंजवडी माण फेज ३ या
नवीन बसमार्ग क्र. ३२८ चा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वा. पार
पडला. या नवीन बसमार्गाचे उद्घाटन मा. श्री. बापूसाहेब पठारे, आमदार, वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघ यांच्या
शुभहस्ते करण्यात आले. या नवीन बसमार्गावर एकूण ४ स्मार्ट एसी इकोफ्रेंडली ई बसेस १ तास वारंवारितेने धावणार
आहेत.
नवीन बसमार्ग क्र. ३२८ चा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक
संदीप सातव व शांताराम कटके, तसेच पंढरीनाथ कटके, पीएमपीएमएल चे सहव्यवस्थापकीय संचालक
नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमास पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे, वाहतूक नियोजन व
संचलन अधिकारी नारायण करडे, प्र. कामगार व जनता संपर्क अधिकारी किशोर चौहान, वाघोली डेपो मॅनेजर
विजयकुमार मदगे यांच्यासह स्थानिक नागरिक व प्रवासी उपस्थित होते.
बसमार्ग क्र. ३२८ चे प्रमुख थांबे पुढीलप्रमाणे –
वाघोली → डायमंड वॉटर पार्क → लोहगाव → धानोरीगाव → विश्रांतवाडी → दिघी → भोसरी → शिवार चौक → मानकर
चौक → इन्फोसिस फेज १ व २ → हिंजवडी माण फेज ३.
पीएमपीएमएल कडून सुरू करण्यात आलेल्या या नवीन मार्गामुळे वाघोली परिसरातील नागरिकांना हिंजवडी
आयटी पार्कपर्यंत जलद, सुलभ व सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे. तरी नवीन बसमार्ग क्र.३२८-वाघोली ते
हिंजवडी माण फेज ३ या बसमार्गाचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून
करण्यात येत आहे.

