नवी दिल्ली / लंडन, २४ जुलै २०२५ — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यात भारत–ब्रिटन मुक्त व्यापार करार (FTA) वर स्वाक्षरी झाल्याचे टीव्हीएस मोटर कंपनीने आज स्वागत केले. हा ऐतिहासिक करार २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ६० अब्ज डॉलर्सवरून १२० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याची अपेक्षा आहे आणि ‘विकसित भारत’ या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच्या पूर्ततेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
हा करार भारत सरकारच्या प्रमुख ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत भारतीय उत्पादन आणि डिझाइन क्षेत्रासाठी जागतिक बाजारपेठा खुल्या करण्याची संधी निर्माण करतो. टीव्हीएस मोटर कंपनीसाठी हा करार अत्यंत योग्य वेळी आला आहे, कारण कंपनीने नुकतेच खरेदी केलेल्या प्रतिष्ठित ब्रिटिश ब्रँड नॉर्टन मोटरसायकल्सची नवीन श्रेणी यूकेमध्ये सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.
या कराराचे स्वागत करताना टीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुधर्शन वेणु म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि भारताला जागतिक उत्पादन आणि डिझाइनसाठी केंद्र बनवण्याचा दृढ निश्चय आम्हाला प्रेरणा देतो. भारत–ब्रिटन मुक्त व्यापार करार हा निर्णायक टप्पा आहे—भारतीय कंपन्यांना ‘मेक इन इंडिया’चा जागतिक स्तरावर विस्तार करण्याची ही सुवर्णसंधी आहे. विशेषतः यावर्षी आम्ही जेव्हा नवीन नॉर्टन मोटरसायकल्स लाँच करत आहोत, तेव्हा भारत–ब्रिटन व्यापार संबंध बळकट होणं आमच्या जागतिक उद्दिष्टांसाठी ऊर्जा देणारं आहे आणि आम्ही जागतिक दर्जाची उत्पादने व ब्रँड तयार करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ करतो.”
टीव्हीएस मोटरच्या मते, भारत–ब्रिटन FTA मुळे भारतीय कंपन्यांना जागतिक स्तरावर आपली उपस्थिती वाढवण्यासाठी अपार संधी उपलब्ध होतील आणि देशाच्या नवकल्पना व अभियांत्रिकी कौशल्याचे प्रदर्शन मोठ्या व्यासपीठावर करता येईल.

