● GenZ नोकरी बदलण्याच्या ट्रेंडला चालना देत आहे, ज्यात 38% लोकांनी मागील सहा महिन्यांत नोकरी बदलली आहे.
● IT, ITeS, आणि GCC क्षेत्र भारतातील सर्वात आकर्षक उद्योग म्हणून उभे राहिले आहे.
● AI चा वापर झपाट्याने वाढला असून, कामावर 5 पैकी 3 कर्मचारी त्याचा नियमित वापर करतात; नोकरी गमावण्याची चिंता असूनही आशावाद वाढत आहे.
● 9 पैकी 10 कर्मचारी पुनःकौशल्य प्रशिक्षणाच्या मदतीची अपेक्षा करतात; हे फक्त नोकरी शोधणाऱ्यांसाठीच नव्हे, तर सध्या नोकरी करत असलेल्या लोकांसाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
बेंगळुरू, : टाटा ग्रुप हा भारतातील सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँड म्हणून उदयास आला आहे, असे रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च (REBR) 2025 च्या निष्कर्षांतून समोर आले आहे — जे जगातील सर्वात व्यापक, स्वतंत्र आणि सखोल नियोक्ता ब्रँड संशोधन आहे आणि दरवर्षी केले जाते.
टाटा ग्रुपने आर्थिक स्थिरता, करिअर प्रगतीच्या संधी आणि प्रतिष्ठा या तीन मुख्य कर्मचारी मूल्य प्रस्ताव (EVP) चालकांवर उच्च गुण मिळविले, ज्यामुळे हा ब्रँड विजेत्या स्थानावर आला. या वर्षी गुगल इंडियाने या यादीत वर चढून दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले, तर इन्फोसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त, या वर्षाच्या अहवालातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, स्टेट बँक ऑफ इंडिया ही एकमेव भारतीय बहुराष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्राची बँक म्हणून टॉप 10 नियोक्ता ब्रँड्सच्या यादीत समाविष्ट झाली आहे.
आता भारतातील 15व्या आवृत्तीमध्ये आणि जागतिक पातळीवर 25व्या आवृत्तीमध्ये असलेला REBR अहवाल टॅलेंट समुदायाच्या बदलत्या प्राधान्यांकडे सखोल दृष्टी देतो. 34 बाजारपेठांमधून 1,70,000 हून अधिक प्रतिसादकांच्या, ज्यात भारतातील 3,500+ समाविष्ट आहेत, अहवालानुसार आजचे टॅलेंट केवळ पगारापेक्षा खूप अधिक अपेक्षा करते. ते समावेशक, भविष्यमुखी कामकाजाच्या ठिकाणी काम करण्यास इच्छुक आहेत, जे वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ यांना समर्थन देतात.
विशेष म्हणजे, भारतातील टॅलेंट त्यांच्या सध्याच्या संस्थांना प्रतिष्ठा, आर्थिक स्वास्थ्य आणि समतेसारख्या घटकांवर उच्च गुण देतात. तथापि, आदर्श नियोक्ताविषयी विचारले असता, काम आणि जीवनातील संतुलन, तसेच आकर्षक पगार व फायदे हे भारतीय नियोक्त्यांनी अजून पूर्ण करावयाचे महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे दिसून आले आहे.
2025 साठी भारतातील टॉप 10 सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँडः
या वर्षी भारतातील टॉप 10 सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँड विविध उद्योगांतील आहेत, जे दर्शविते की, आजच्या टॅलेंटच्या संधी अनेक क्षेत्रांमध्ये पसरल्या आहेत. हे या गोष्टीची जाणीव करून देते की, नियोक्त्यांमध्ये कडक स्पर्धा आहे; ते केवळ स्वतःच्या क्षेत्रातील कंपन्यांशीच नव्हे, तर विविध उद्योगांमधील कंपन्यांशीही सर्वोत्तम टॅलेंट आकर्षित करण्यासाठी स्पर्धा करत आहेत.
1. टाटा समूह
2. गूगल इंडिया
3. इन्फोसिस
4. सॅमसंग इंडिया
5. जेपीमॉर्गनचेस
6. आयबीएम
7. विप्रो
8. रिलायन्स इंडस्ट्रीज
9. डेल टेक्नॉलॉजीज लिमिटेड
10. स्टेट बँक ऑफ इंडिया
REBR 2025 च्या अहवालाचे सादरीकरण करताना, रँडस्टॅड इंडिया या टॅलेंट कंपनीचे एमडी आणि सीईओ, विश्वनाथ पीएस यांनी सांगितले की, “रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च हे सतत बदलत चाललेल्या टॅलेंटच्या जागतिक परिसंस्थेत संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन ठरते. 2025 च्या निष्कर्षांत स्पष्टपणे दिसून येते की, आजचा कर्मचारी पारंपरिक नोकऱ्यांमध्ये समाधान मानत नाही; ते समतेची अपेक्षा करतात, उद्दिष्ट असलेली कामे, अर्थपूर्ण वाढ आणि काम–जीवन यामध्ये संतुलन शोधत आहेत.
या वर्षीच्या डेटामध्ये, विशेषतः तरुण टॅलेंटमध्ये नोकरी बदलण्याची इच्छा वाढल्याचेही दिसते. हे नियोक्त्यांसाठी एक जाणीव जागरण आहे की, केवळ तात्पुरते फायदे देण्यापुरते थांबून न राहता, विश्वास, पारदर्शकता आणि सामाईक उद्दिष्ट यावर आधारित संस्कृती निर्माण करणे गरजेचे आहे. काम–जीवन संतुलन पुन्हा एकदा कर्मचारी मूल्य प्रस्तावातील (EVP) प्रमुख घटक बनले असून, सर्व वयोगटांमध्ये पुनःकौशल्य प्राप्ती (reskilling) सुद्धा प्राधान्यक्रमात आहे. त्यामुळे संस्थांनी आपली EVP धोरणे नव्याने आखून, बदलत्या गरजांनुसार जुळवून घ्यावी लागतील.
जशी आपण कौशल्यांवर आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतो, तसतसे सर्वोत्तम टॅलेंटसाठी स्पर्धा अधिक तीव्र होत जाईल. समावेशकता प्रोत्साहन देणाऱ्या, सतत शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या आणि टॅलेंटच्या खऱ्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणाऱ्या संस्था यशस्वी होतील. मला खात्री आहे की, REBR 2025 अहवाल प्रत्येक नियोक्त्यासाठी एक प्रभावी आणि रणनीतिक मार्गदर्शक ठरेल, ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने टॅलेंटसाठी आकर्षक ठरू शकतील.”
REBR 2025 अहवालातील मुख्य निष्कर्षः
नोकरी बदलण्याचा मानस वाढत चालला आहे. भारतातील 47% कर्मचारी 2025 च्या पहिल्या सहामाहीत नोकरी बदलण्याचा विचार करत होते, ज्यात Gen Z (51%) आणि Millennials (50%) यांचा नियोक्ता बदलण्याचा मजबूत मानस दिसून आला.
कर्मचारी कामाशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहेत; 86% भारतीय कर्मचाऱ्यांनी स्वतःला अत्यंत प्रेरित असल्याचे सांगितले, तर फक्त 5% कर्मचारी कमी प्रमाणात कामाशी जोडलेले होते, तरीही 67% असंतुष्ट कर्मचारी नोकरी बदलण्याचा विचार करीत आहेत, जे गुंतवणूक आणि टिकवणुकीमधील संबंध दर्शवितात.
Gen Z आणि Millennials या पिढ्या समता आणि समावेशाला Gen X पेक्षा जास्त प्राधान्य देतात, तर Gen X काम-जीवन संतुलनावर अधिक लक्ष केंद्रित करतात. Gen Z संस्थेच्या नेतृत्वाच्या ताकदीपेक्षा प्रशिक्षण आणि विकासाला अधिक महत्त्व देतो. Millennials सर्वात समाधानी पिढी असून, ते आपल्या नियोक्त्यांना पगार, समता आणि काम-जीवन संतुलनासाठी उच्च गुण देतात.
AI चा वापर वेगाने वाढतो आहे, सध्या 61% भारतीय कर्मचारी नियमितपणे AI वापरतात. Millennials या वापरकर्त्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय असून, मागील वर्षीच्या तुलनेत 13% वाढ झाली आहे. 38% कर्मचाऱ्यांना वाटते की, AI त्यांचे काम लक्षणीय पद्धतीने प्रभावित करत आहे.
पुनःकौशल्य प्राप्ती (Reskilling) अजूनही महत्त्वाचा विषय आहे, विशेषतः उच्चशिक्षित व्यावसायिकांसाठी. 9 पैकी 10 कर्मचारी अशा नियोक्त्यांना अधिक महत्त्व देतात, जे अपस्किलिंगच्या संधी देतात.
सुमारे 49% भारतातील कामगार अल्पसंख्याक गटाशी संबंधित असल्याचे ओळखतात. विशेष म्हणजे, तरुण पिढ्यांमध्ये अल्पसंख्याक ओळख जास्त आहे – Gen Z मध्ये 55% आणि Millennials मध्ये 50%. सकारात्मक बाब म्हणजे, अल्पसंख्याक कर्मचारी पुनःकौशल्य संधींबाबत आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळणाऱ्या न्यायाबाबत अधिक सकारात्मक आहेत. मात्र, बरेच जण करिअरमध्ये प्रगतीच्या संधींमध्ये अडचणींचा अनुभव घेत असल्याची नोंद आहे.
काम–जीवन संतुलन उद्योगांमध्ये सर्वसामान्य आणि महत्त्वाची गरज म्हणून उभी राहिली आहे. मात्र, भूमिका आणि उद्योगानुसार अपेक्षा वेगवेगळ्या आहेत: मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाइल, लाइट इंडस्ट्रियल, सप्लाय चेन व लॉजिस्टिक्स, हेवी इंडस्ट्री, एनर्जी व इन्फ्रास्ट्रक्चर, तसेच कौशल्यप्रधान व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या टॅलेंटला नोकरीची सुरक्षितता महत्त्वाची वाटते, तर फार्मा, हेल्थकेअर व लाइफसायन्सेस, फायनान्स/ITeS, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स, बिझनेस कन्सल्टिंग, इंजिनिअरिंग, सेल्स, ट्रेड व मार्केटिंग, BFSI, होलसेल, रिटेल, डिझाइन व R&D क्षेत्रातील टॅलेंटना मजबूत व्यवस्थापन आणि करिअर वाढ अधिक महत्त्वाची वाटते.

