पुण्याच्या कलाकेंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावाकडून गोळीबार…

Date:

पोलिसांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप

पुणे- दौंड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार करणारा कोण? हे शोधण्याची गरज आहे. पण ते हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणालेत.यासंबंधीच्या माहितीनुसार, दौंडच्या चौफुला परिसरात 3 कलाकेंद्र आहेत. गाणी, नृत्य, लावणी अशा विविध कला इथे सादर केल्या जातात. सोमवारी रात्रीही नेहमीप्रमाणे इथे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होते. पण तिथे आलेल्या दोन गटांत आवडीची लावणी सादर करण्यावरून बाचाबाची झाली. त्यातूनच हा गोळीबार झाल्याचा दावा केला जात आहे. मंगळवारी ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियात पसरली. त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. त्यात तिन्ही कलाकेंद्र चालकांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास सुरू केला.स्थानिकांच्या माहितीनुसार, या कलाकेंद्रांमध्ये कलेच्या नावाखाली अनेक विभत्स प्रकार सुरू असतात. मद्यपान करून रात्री – अपरात्री राजरोसपणे धिंगाणा सुरू असतो. राजकीय पक्षांचे पुढारी, गुन्हेगार, उद्योजक आदी विविध क्षेत्रातील बडी आसामी इथे येतात. पण पोलिस त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात.

दरम्यान सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांचे नेते गत काही दिवसांपासून सातत्याने वादात सापडत आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात पत्ते खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सरकारची सर्वत्र छी थू होत असताना आता रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने चक्क कलाकेंद्रात गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत? हे शोधण्याऐवजी पोलिस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.

दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’ कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्थेत अनंत कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या एका पोस्टमध्ये केली आहे. रोहित पवार यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियात कलाकेंद्रात धुडगूस घालणारा आरोपी कोणत्या आमदाराचा भाऊ आहे? याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेषतः या घटनेत एक तरुणी जखमी झाल्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल मॉस्को-रशियाने...