पुणे-
पुणे शहरातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पत्रकार संघातील आजी माजी सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे शहरातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली अर्पण सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती.यावेळीं पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील,सरचिटणीस मंगेश फल्ले,प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे,दिवंगत पत्रकार अमित गोळवलकर यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.यावेळी शैलेश काळे,शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे ,निवृत्त सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे,राजेंद्र जोशी,ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे, अभय कुलकर्णी,स्वप्नील पोरे, कल्पना खरे यांच्यासह नम्रता वागळे,अंजली खमीतकर,सुनीत भावे,स्वप्नील बापट,मिलींद वाडेकर, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी श्रद्धांजली अर्पण करत मनोगत व्यक्त केले.गोळवलकर यांचा मुलगा अॅड.अथर्व गोळवलकर यानेही आपल्या पित्या बद्दल आठवणी शेवटी सांगितल्या.त्यानंतर सर्वांनी एक मिनीट स्तब्ध उभे राहून दिवंगत अमित गोळवलकर यांच्या स्मृतींना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण केली.
सडेतोड बोलणार हसमुख पत्रकार गेला..
यावेळी सर्वांनीच त्यांच्या बद्दलच्या आठवणी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितल्या,गोळवलकर हे क्राईम आणि क्रीडा रिपोर्टर होते मात्र ,बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांचे होते.प्रिंटसह चॅनल क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला.त्यांनी जलतरण क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.टिळक जलतरण तलावाचे सचिव म्हणून त्यांनी भरीव काम केले अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठविलेल्या शोक संदेशही वाचून दाखविण्यात आला.

