खडसे म्हणाले, महाजनांचे डोके फिरलेले दिसतंय,हनीट्रॅप प्रकरणी फडणवीसांनी एसआयटी स्थापन करावी–एकनाथ खडसे पुढे म्हणाले, प्रफुल्ल लोढावर आत्ताच कसे गुन्हे दाखल व्हायला लागले? मुंबईती साकीनाका आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. हे गुन्हे एकाच डीएसपीच्या अंतर्गत कसे दाखल होतात? त्याच तारखांच्या दरम्यान पुण्यातही एक गुन्हा दाखल होतो. कुठल्या महिला आहेत? हे कळत नाही. एफआयआरची कॉपी मागितली तर मिळत नाही. हे सर्व चाललंय का? सध्या लोढावर वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत, तीन ठिकाणी हनी ट्रॅफ प्रकरणात लोढावर गुन्हे दाखल आहेत.
गिरीश महाजन हनीट्रॅपमध्ये असल्याचा संशय – खडसे….गिरीश महाजन हॉटेल ट्रायडन येथे माझे तीन महिने पाय धरत होते असे प्रफुल लोढा यांनी म्हटले आहे. नेमके काय आहे ट्रायडेंट हॉटेल प्रकरण? असा प्रश्न विचारला असता, हनी ट्रॅपमधे गिरीश महाजन आहे, असा माझा संशय असल्याचे खडसे यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री यांच्याबाबत माझा राग नाही. नाशिकमधील व्यक्ती त्यांना माहिती आहे, हॉटेल देखील माहिती आहे. त्यामुळे त्यांनी याची चौकशी करावी, तात्काळ एसआयटी नेमा अशी माझी मागणी आहे, असेही खडसेंनी पत्रकार परिषदेत म्हटले.
जळगाव : सध्या चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रफुल लोढा याच्या संदर्भाने भाजप नेते गिरीश महाजन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे या दोघांमध्ये जुंपली आहे. गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅपचे आरोप असणाऱ्या प्रफुल्ल लोढाचा दाखला देत खडसेंवर त्यांच्या मुलाला संपवल्याचा आरोप केला होता. आता, महाजनांच्या या दाव्यावर एकनाथ खडसेंनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिली. हिंमत असेल तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खडसेंनी केली आहे.त्याबरोबर हनी ट्रॅप प्रकरणामुळे महाजनांचे डोके फिरलेले दिसतंय असेही ते म्हणालेत .
एकनाथ खडसे म्हणाले की, गिरीश महाजन आज सरकारमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळचा झाल्याचे लोक म्हणतात. त्यामुळे त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्या मुलाच्या मृत्युसंदर्भात चौकशी करावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिले. पोलिसांकडून माझी एकदा चौकशी झालेली आहे. पण पोलिस यांची चौकशी करणार नाही. म्हणून माझ्या मुलाच्या मृत्युसंदर्भात सीबीआय चौकशी करा.
खडसे पुढे म्हणाले, यांचे डोके फिरलेले दिसतंय. माझा एकुलता एक मुलगा गेला. त्याचे दु:ख अजून माझ्या मनातून गेलेले नाही. गिरीश महाजनला मुलगा नसल्यामुळे मुलाचे दु:ख काय असते ते समजू शकणार नाहीत. त्यामुळे माझ्यावर बेछुट आरोप करत आहेत. तुमच्यात ताकद असेल, हिंमत असेल, सरकार खरंच तुमचे ऐकत असेल, तर सीबीआयकडून चौकशी करून सत्य काय आहे ते बाहेर काढा. वारंवार हवेत वाफा का सोडत आहात, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली.
एकनाथ खडसे हे आजारपण व सर्वदूर अपयश यामुळे द्वेषभावनेने पछाडले गेलेत. त्यांची मानसिकताच खराब झाली आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली होती. यावरही एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्रजींविषयी मी कधी आक्षेपार्ह बोललोच नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले. हनीट्रॅप आणि बलात्कार प्रकरणाची चौकशी खालचे अधिकारी करणार नाहीत. त्यांच्यावर दबाव येईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी. मुख्यमंत्री हे महिलांच्या बाबती संवेदनशील आहेत, हे मी तीन दिवसांपासून सांगत आहे. मुख्यमंत्र्यासोबतचे असल्यामुळे महाजनांवर संशय घ्यायचा असे काही नाही. जे सत्य आहे ते बाहेर आणले पाहिजे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

