पुणे-आयोध्येमधील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय सन घोषित करून दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची विनंती करणारे पत्र पुण्यातून भाजपचे नेते श्रीनाथ भिमाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविले आहे.
या पत्रात भिमाले यांनी असे म्हटले आहे कि,’आपल्या भारत देशातील सर्व नागरिकांकरिता एक आनंदाची बातमी म्हणजेच आयोध्येमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर भगवान श्री राम विराजमान होणार आहेत. याकरिता प्रत्येक भारतीय अगदी मनापासून आतुर झालेला आहे. आपण सर्वजण अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या शुभ प्रसंगाजवळ येत आहोत. २२ जानेवारी २०२४ रोजी सुमारे ५०० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संपूर्ण भारत देशात आनंद उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे. जसे काही दिवाळी सारखाच प्रत्येक भारतीय हा सन साजरा करणार आहे. मी तुम्हाला विनंती करू इच्छितो कि २२ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय सन घोषित करून दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा विचार करावा, सार्वजनिक सुट्टी घोषित केल्याने नागरिकांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण निर्माण होऊन सर्व नागरिक श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त साजरे केल्या जाणाऱ्या ऐतिहासिक उत्सवात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
मला संपूर्ण विश्वास आहे की, आपण या विनंतीचा व आपल्या देशभरातील नागरिकांच्या भावनांचा विचार करून आयोध्येमधील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय सन घोषित करून दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी ही नम्र विनंती आहे. असे भिमाले यांनी मोदींना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.


