पुणे- तुम्ही कुठे मद्यप्राशन करत आहात किंवा खरेदी करत आहात हे आता जपून आणि सावधानतेने पाहण्याची गरज निर्माण झाली असून प्रख्यात ब्रँडच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूचा सुळसुळाट पुणे शहर आणि जल्ह्यात झाल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे, जसे पुणे पोलिसांना रोजच कट्टे गोळ्या मिळत आहेत , किंवा मॅफेड्रोन, गांजा सारखे अंमली पदार्थ रोजच सापडत आहेत त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोवा बनावटीच्या दारूने हैराण करून सोडले आहे.
पाटस टोल नाक्याजवळ, पाटस ता. दौंड, जि.पुणे येथे राज्य उत्पादन शुल्क च्या दौंड विभागाच्या पथकाने पुण्याच्या दिशेने पाठोपाठ येणाऱ्या दोन संशयित वाहनांची तपासणी करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा राज्य बनावटीच्या मद्याचे ७५० मि.लो चे २५ बॉक्स (३०० बाटल्या) पकडले . सदर प्रकरणी आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून पुढील तपासात जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी छापे टाकून तीन चार चाकी वाहने व ८४ बॉक्स मद्यासह ४७७९ बूचे असा एकूण रु. ३९,५६,४९५/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आणि पाच आरोपीना अटक केली आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी, एम. व्ही. गाडे दुय्यम निरीक्षक, दौंड क्र.१ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम शिंदे, उप-अधोक्षक, हडपसर व निरीक्षक दौंड विभागाच्या पथकाने पाटस येथील टोल नाक्याजवळ सापळा रचून इंदापूर कडून पुण्याच्या दिशेने लागोपाठ जाणाऱ्या संशयित मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच-१२ आरएन ९४३१) व मारुती स्विफ्ट (एमएच-१२ ईटी ४४८५) या दोन वाहनांची तपासणी केली असता दोन्ही वाहनात मिळून गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक व्हिस्को या ब्रँडचे एकूण ४३ बॉक्स मिळून आले. या प्रकरणी आरोपी संतोष सुनील मारकड, वय-२१ रा, एच नं ३/७७८/दत्तवाडी (दत्तनगर), उरळीकांचन, ता, हवेली, जि. पुणे व वैभव शिवाजी तरंगे वय २२ वर्षे, रा. भंवरापूर रोड, व्यंकटेश नगर, ता. हवेली, जि. पुणे यांना अटक करण्यात आली.
या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हयामध्ये पुढील तपासा दरम्यान उरुळीकांचन ता. हवेली, जि. पुणे येथे आरोपी संतोष सुनील मारकड याच्या राहत्या घरी गोवा राज्य बनावटीचे अॅडरील क्लासीक व्हीस्की ७५० मि.ली चे ११ बॉक्स (१३२ बाटल्या) व ५५९ बुचे व रिकाम्या बाटल्या इत्यादी असा एकुण रुपये १,३२,०७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच चंदनवाडी येथील हॉटेल गावकरी येथे अॅडरील क्लासीक व्हीस्की ७५० मि.ली चे ५ बॉक्स (६० बाटल्या), रॉयल व्हीस्की १८० मि.लीच्या (४२ बाटल्या), इम्पीरीअल ब्ल्यु व्हीस्की १८० मि.ली च्या (६ बाटल्या), ऑफीसर्स चॉईस व्हीस्कीच्या १८० मि.ली च्या (३० बाटल्या), डिएसपी ब्लॅक व्हीस्की १८० मि.ली च्या (१४ बाटल्या), आयकॉनीक व्हीस्की ९०मि.ली च्या (१५ बाटल्या), ग्रॅण्ड मास्टर ओडका ९० मि.ली च्या (५१ बाटल्या), बॅगपायपर व्हीस्की १८० मि.ली क्षमतेच्या (२५ बाटल्या). असा एकुण रुपये ९६,८७५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी आकाश बाळासाहेब कोडलिंगे, रा. चंदनवाडी याला अटक करण्यात आली आहे.
तसेच नांदुर येथील हॉटेल पैलवान येथे गोवा राज्य बनावटीचे अॅडरील क्लासीक व्हीस्की ७५० मि.ली चे ४ बॉक्स (४८ बाटल्या), रॉयल स्टॅग व्हीस्की १८० मि.ली च्या (१० बाटल्या), इम्पीरीअल ब्ल्यू व्हीस्की १८० मि.लीच्या (५ बाटल्या), मॅक्डॉवल नं. १ व्हीस्की, ऑफीसर्स चॉईस व्हीस्कीच्या ९० मि.ली च्या (२२ बाटल्या), रॉयल चॅलेंजर्स व्हीस्की, ओक्समीत व्हीस्की १८० मि.ली च्या (१४ बाटल्या) असा एकुण रुपये ६८६८०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी कुणाल सुनिल कोल्हे, रा. नांदुर याला अटक करण्यात आली.
तदनंतर या आरोपींकडून मिळालेल्या माहीतीनुसार क्र.५ बबन देवचंद पावने, रा. मोई, निघोजे रोड, मोई ता. खेड.जि. पुणे याच्या राहत्या घरी हयुडाई कंपनीच्या क्रेटा चारचाकी वाहन क्र. एमएच १४ के.ई. ७००२ मध्ये गोवा राज्य निर्मीत अॅडरील क्लासीक व्हीस्की ७५० मि.ली चे ९ बॉक्स (१०८ बाटल्या), मॅकडॉल नं. १ व्हीस्की १८० मि.ली च्या २४० बाटल्या, इम्पेरीयल ब्लू व्हीस्की च्या १८० मि.ली च्या १४४ बाटल्या, रॉयल स्टॅग व्हीस्कीच्या १८०मि.ली च्या २८ बाटल्या, देशी दारु पावर पंच ९० मि.ली च्या २०० बाटल्या तसेच बनावट मद्य तयार करण्याकरीता लागणारे मशीन आरएस, मॅक्डॉवल नं. १ चे बनावट ४००० बुचे, विवीध विदेशी मद्याचे रिकाम्या बाटल्या. असा एकुण एकुण रु. १३,९४,७९०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि बबन देवचंद पावने, रा. मोई याला अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हयामध्ये आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए), (डी), (इ), (एफ), ८०, ८१, ८३, ९०, १०८ व भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३ नुसार गुन्हा नोंदविण्यात येऊन आरोपींना दि १९/०७/२०२५ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक अ.अ. कानडे,उपअधीक्षकउत्तम शिंदे तसेच विजय रोकडे, एन.एस देवणे, शहाजी शिंदे, निरीक्षक, दु. निरीक्षक एम. व्ही गाडे, प्रदीप झुंजरुक, डी.आर ठाकुर, दिनेश सुर्यवंशी, सागर साबळे, विकास थोरात, सहाय्यक दु. निरीक्षक, जवान शुभम भोईटे, डी.जे साळुंखे, निलेश पवार, केशव वामने, संकेत वाजे, एस आर देवकर, गोपाळ कानडे, एस.एस. कांबळे, कर्च, सागर दुबळे यांनी सहभाग घेतलेला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, बीट क्र.१, चे दुय्यम निरीक्षक एम. व्ही गाडे, हे करत आहेत.
पुणे जिल्हयामध्ये कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री. क्र. 18002339999 व दुरध्वनी क्र. 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

