Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मराठी भाषा का महत्त्वाची? ऐकलीत का ‘आता थांबायचं नाय’ मागची ती खरी गोष्ट?

Date:

मुंबईत अनेक भाषा बोलल्या जातात. पण जी भाषा हृदयातून उमटते, ती म्हणजे मराठी. ती कोणावर लादली जात नाही — ती प्रेमानं स्वीकारली जाते. आणि आजही या शहरात, महाराष्ट्रात, जेव्हा दर्जेदार कंटेंटची गोष्ट होते, तेव्हा लोक म्हणतात, “मराठी कलाकृतीला तोड नाही.”

याचं अलीकडचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘आता थांबायचं नाय!’ — एक असा चित्रपट, ज्याचं नाव फक्त शीर्षक नाही, तर अनेकांची मनस्थिती आहे. हा सिनेमा फक्त मराठीत आहे, पण त्याचं स्वागत सगळ्या भाषांतील प्रेक्षकांनी केलं. विशेषतः हिंदी भाषिक प्रेक्षक, पत्रकार आणि सेलिब्रिटींनी या सिनेमाचं मनापासून कौतुक केलं — कोणी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली, कोणी फोन करून अभिनंदन केलं. अनेकांनी एक गोष्ट स्पष्टपणे कबूल केली — “आज मराठी भाषा, त्यातल्या कलाकृती पाहण्यासारख्या आहेत.”

या सिनेमात सिद्धार्थ जाधवने साकारलेली मारुती कदम ही व्यक्तिरेखा वेगळी आहे. एक बाप, जो परिस्थितीनं हरवलेला आहे, पण आपल्या मुलीसाठी पुन्हा उभा राहतो. त्या प्रवासात त्याला साथ देतो एक दुसरा विस्कटलेला माणूस — सखाराम मंचेकर, ज्याची भूमिका भरत जाधव करतात . मंचेकरांची भूमिका आहे एका आजोबाची, नातवासाठी केलेल्या त्यांच्या बदलाची. त्यांच्या झगड्याची. आणि त्या झगड्यातून उगम पावणाऱ्या एका नव्या जिद्दीची.

त्यांच्याबरोबर अनेक उत्कृष्ट कलाकार आहेत आणि प्रत्यकाची वेगळी गोष्ट आहे .. ओम भुतकर, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर , किरण खोजे, श्रीकांत यादव, दीपक शिर्के — आणि छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, तर आशुतोष गोवारीकर एका विशेष भूमिकेत दिसतात अर्थात, हे सगळेच मराठी कसलेले कलाकार . पण मराठी चित्रपट एवढ्यावर थांबत नाही — तो सर्व भाषिकांना आपल्यात सामावून घेतो.

या चित्रपटात फक्त मराठी कलाकारच नाहीत, तर तंत्रज्ञ, संगीतकार, एडिटर — सगळ्यांचा उल्लेख करायला हवा. कारण इथे भाषेपेक्षा मराठी भावना मोठी ठरली.
संगीतकार गुलराज सिंग, एडिटर संजय संकला, छायाचित्रकार संदीप यादव — हे सर्व हिंदी चित्रपटसृष्टीतून आलेले. पण त्यांनीही आपल्या कामातून मराठी भाषेवर प्रेम व्यक्त केलं.

चित्रपटाची दिग्दर्शनाची जबाबदारी घेणारा शिवराज वायचळ — अर्थात मराठमोळा. पण पहिल्याच सिनेमात इतक्या विविध पार्श्वभूमीच्या लोकांना एकत्र आणून एक सच्चा मराठी सिनेमा उभा करतो — हेच मराठीच्या आत्मविश्वासाचं दर्शन आहे.

निर्मितीमध्येही हाच भाव दिसतो. झी स्टूडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स , आणि फिल्म जॅझ — या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या टीम्स. निर्माते — निधी परमार, धर्म वालिया, तूषार हिरचंदानी , उमेश बन्सल,आणि बवेश जानवलेकर यांपैकी अनेकजण हिंदी प्रोजेक्ट्समध्ये सक्रिय असले, तरी त्यांनी ही गोष्ट ठामपणे मराठीत मांडायचं ठरवलं. कारण ती गोष्ट फक्त मराठीतच खरी वाटली.

बवेश जानवलेकर , झी स्टूडिओज मराठी आणि झी टॉकीज चे प्रमुख, एका वाक्यात म्हणाले :

“ही फक्त फिल्म नव्हती — ही भावना होती. मराठी ही भाषा निवडली, कारण ती खरी वाटली. आणि तिच्यात गोष्ट माणसांपर्यंत पोहोचवण्याची ताकद होती.”

आता ही गोष्ट, जी थिएटरमधून मनात उतरली, ती घराघरात पोहोचणार आहे.
‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा टॉकीज प्रीमियर
२७ जुलै, रविवार, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, झी टॉकीज वर.

हा चित्रपट पाहणं म्हणजे फक्त मराठी गोष्ट बघणं नाही कारण देशाने या चित्रपटावर प्रेम केलय त्यामुळे मराठी माणसाने मराठीचा सन्मान करणं आहे आणि स्वतःला आठवण करून देणं की, “आता थांबायचं नाय.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...