गोदरेजच्या वॉशिंगमशीनमध्ये कपडे धुण्याचे काम आता अजूनच सोप्पे झाले आहे. गोदरेजने आपल्या ग्राहकांसाठी एआय पॉवर्ड फ्रंट लोड मशीन बाजारात उपलब्ध केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक रचनेमुळे या मशीनमध्ये कपड्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. मशीनमध्ये धुतलेले कपडे अगदी नव्यासारखे दिसतात. ही एआय पॉवर्ड मशीन ६.५ किलो ते १० किलो वजनाच्या क्षमतेसह उपलब्ध आहे. गोदरेजची ही एआय पॉवर्ड फ्रंट लोड मशीन भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. देशभरातील विविध भागांतील हवामान, भौगोलिक स्थिती, प्रत्येक कुटुंबातील राहणीमान, सदस्यांची संख्या तसेच कपडे धुण्याच्या सवयी या सर्व घटकांचा अभ्यास करत तज्ज्ञांनी या मशीनची निर्मिती केली आहे.
एआय पॉवर्ड मशीनमध्ये कपडे धुणे सोप्पे झाले आहे. या मशीनमधील प्रक्रियांचे नियंत्रण सहज हाताळता येते. कपड्यांच्या वजनानुसार पाण्याचा वापर केला जातो, कपड्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. यामुळे पाण्याची आणि विजेची बचत होते. ग्राहकांसाठी कपडे धुण्याचा अनुभव सोयीस्कर ठरतो. मशीनमध्ये कपडे पूर्णपणे स्वच्छ धुतले जावे म्हणून स्टीम वॉश प्रोग्राम ही सोय उपलब्ध आहे. यासह कपड्यांमधून येणारा वास घालवण्यासाठी रिफ्रेश प्रोग्राम आणि कपड्यांची गुणवत्ता टिकून राहावी म्हणून फेब्रीसेफ ड्रम™ या गोदरेज फ्रंट लोड वॉशिंगमशीनमध्ये उपलब्ध आहे. ही मशीन शंभरपेक्षा जास्त डाग धुण्याची क्षमता ठेवते. दोन दिवस जुने डागही* गोदरेजच्या एआय पॉवर्ड फ्रंट वॉशिंगमशीनच्या साहाय्याने सहज धुतले जातात. कपडे ३० मिनिटे** जलद सुकवण्यास मदत करते . या मशीनच्या वापराने रोजचे कपडे धुणे अधिक सोयीचे झाले आहे. या मशीनमध्ये वापरकर्त्यांच्या सोयीसाठी ऑटो टब क्लीन रिमांइडर, ओव्हरफ्लो प्रोटेक्शन, अँटी-रस्ट कॅबिनेट आदी सुविधा आहेत. या रेंजला संपूर्ण ४ वर्षांची वॉरंटी आणि १० वर्षांची मोटर वॉरंटी मिळते.

