Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स’चा नफा तिमाहीत ३४.२ टक्क्यांनी वाढून ३०२ कोटींवर

Date:


एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीतील ठळक कामगिरी :

·         करपश्चात नफा वर्षभरात ३४.२ टक्क्यांनी वाढून ३०२ कोटी.

·         नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस – व्हीएनबी) ४५७ कोटींवर, व्हीएनबीचे मार्जिन २४.५ टक्के.

·         खासगी संरक्षण योजनांतील वार्षिक प्रीमियम समतुल्यात २४.१ टक्के वाढ, आकडा पोहोचला १३९ कोटींवर.

·         नवीन व्यवसायातील विमाराशी ३६.३ टक्क्यांनी वाढून झाली ३.७ लाख कोटी.

·         कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ३० जून २०२५ रोजी होती ३.२ लाख कोटी रुपये, एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत तिच्यात ५.१ टक्के वाढ

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी’ने २०२५-२६ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (क्यू१-एफवाय२०२६) ३०२ कोटी रुपयांचा एकूण करपश्चात नफा कमावला असून वार्षिक दराने ३४.२ टक्क्यांची वाढ साधली आहे. भविष्यातील नफ्याचे सध्याच्या मूल्यांकनातील मोजमाप असलेले व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस, म्हणजे नवीन व्यवसायाचे मूल्य ४५७ कोटी रुपये इतके नोंदले गेले असून, त्याचे मार्जिन २४.५ टक्के झाले आहे. वितरकांचे जाळे आणि उत्पादनांचा सर्वंकष संच यांच्या जोरावर कंपनीने एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत एकूण प्रीमियममध्ये ८.१ टक्के वार्षिक वाढ दर्शवली.

एप्रिल ते जून या तिमाहीत एकूण वार्षिक प्रीमियम समतुल्य (एपीई) १,८६४ कोटी इतका झाला आहे. कंपनीच्या रिटेल नव्या व्यवसायाची विमा रक्कम ३१.५ टक्क्यांनी वाढून ७७,७५० कोटी झाली आहे. तर एकूण चालू विमा रक्कम, म्हणजे ग्राहकांनी घेतलेल्या एकूण विमा संरक्षणाची रक्कम १७.१ टक्क्यांनी वाढून ४१.१ लाख कोटींवर पोहोचली आहे. कंपनीकडे वितरकांचे एक संतुलित जाळे असून, वेगवेगळ्या ग्राहक गटांनी पसंती दिलेल्या विविध प्लॅटफॉर्म्सवर ते सक्रिय आहे. ‘क्यू१-एफवाय२०२६’मध्ये एपीईमध्ये पुढीलप्रमाणे योगदान झाले – एजन्सी : २४.९ टक्के, थेट : १३.५ टक्के, बँकाशुरन्स : २९.७ टक्के, भागीदारी वितरण : १२.९ टक्के, आणि गट व्यवसाय : १८.९ टक्के.

कंपनीच्या खर्च ते प्रीमियम या प्रमाणात सुधारणा झाली असून, ‘क्यू१-एफवाय२०२५’मधील २४.० टक्क्यांवरून ते ‘क्यू१-एफवाय२०२६’मध्ये २१.२ टक्क्यांवर आले आहे. बचत योजनांसाठी हे प्रमाण १६.८ टक्क्यांवरून १४.१ टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. कंपनी सातत्याने खर्च कार्यक्षमतेसाठी उपक्रम राबवत असून, उत्पादन संयोगानुसार खर्चाची संरचना योग्य राहील याची काळजी घेत आहे.

कंपनीच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ३० जून २०२५ रोजी ३.२ लाख कोटी इतकी होती. ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाचे, नव्या व्यवसायातील वाढीचे, शाश्वत व्यवसायाचे आणि मजबूत फंड व्यवस्थापनाचे हे फलित आहे.

कंपनीच्या भक्कम जोखीम व्यवस्थापन प्रणालीमुळे कंपनीची सुरुवातीपासूनच एकही बुडीत मालमत्ता (एनपीए) नसलेली कामगिरी कायम राहिली आहे. ३० जून २०२५ रोजी कंपनीचा सॉल्व्हन्सी रेशो २१२.३ टक्के इतका होता. नियामकांच्या निकषापेक्षा, म्हणजे १५० टक्क्यांपेक्षा तो लक्षणीय जास्त आहे.

शाश्वततेविषयीची बांधिलकी ही कंपनीच्या दूरदृष्टीचा एक मुख्य भाग असून, ग्राहकांचे विमा संरक्षण आणि दीर्घकालीन बचतीच्या गरजांकडे संवेदनशीलतेने पाहणाऱ्या संस्थेची उभारणी करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनी दोन प्रमुख ईएसजी रेटिंग संस्थांनुसार सर्वाधिक रेटिंग मिळवणारी भारतीय विमा प्रदाती ठरली आहे. एमएससीआय या संस्थेने कंपनीला ‘एए’ हे ईएसजी मानांकन दिले, त्यामुळे भारतातील उच्च मानांकन मिळवलेल्या आयुर्विमा कंपन्यांमध्ये ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स’ला स्थान मिळाले आहे.

या तिमाहीतील कामगिरीवर भाष्य करताना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप बागची म्हणाले, “आमच्या धोरणानुसार ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत आम्ही उत्पादने व प्रक्रिया सोप्या करीत आहोत, वितरणाचे जाळे बळकट करीत आहोत, खर्चाची संरचना आमच्या उत्पादन संचानुसार जुळवत आहोत आणि व्यवसायातील जोखमी सक्रियपणे हाताळत आहोत. या पार्श्वभूमीवर ‘क्यू१-एफवाय२०२६’मधील आमची कामगिरी ही आमच्या व्यवसाय मॉडेलची ताकद व स्थिरता दाखवते. आमचा करपश्चात नफा वर्षभरात ३४.२ टक्क्यांनी वाढून ३०२ कोटी झाला. व्हीएनबी ४५७ कोटी आहे आणि त्याचे मार्जिन २४.५ टक्के आहे.

‘क्यू१-एफवाय२०२६’मध्ये आमच्या विस्तृत वितरण जाळ्याच्या आणि संपूर्ण उत्पादन संचाच्या जोरावर आम्ही एकूण प्रीमियममध्ये ८.१ टक्के वार्षिक दराची वाढ नोंदवली. विमा संरक्षण हेच आमच्या व्यवसाय धोरणाचे केंद्रस्थान असून, रिटेल संरक्षण व्यवसायात आम्हाला २४.१ टक्के इतकी मजबूत वाढ मिळाली आहे. याच कालावधीत आमच्या एकूण नव्या व्यवसायाची विमाराशी ३६.३ टक्क्यांनी वाढली आहे.

ग्राहक-केंद्री दृष्टिकोन बाळगल्यामुळे बचत योजनांच्या बाबतीत ५४ टक्के पॉलिसी आम्ही एका दिवसातच जारी करू शकलो. व्यक्तिगत मृत्यू दाव्यांमध्ये चौकशी न करता मंजूर झालेल्या दाव्यांची सरासरी प्रक्रिया वेळ १.१ दिवस इतकी असून, दाव्यांच्या निवारणाचा दर ९९.६ टक्के इतका आहे. आमची पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा यातून स्पष्ट होते.

लक्षवेधी बाब म्हणजे, आमच्या खर्च कार्यक्षमतेच्या उपक्रमांमुळे बचत योजनांतील खर्च ते प्रीमियम प्रमाण २७० बेसिस पॉईंट्सने कमी होऊन ‘क्यू१-एफवाय२०२६’मध्ये १४.१ टक्क्यांवर आले आहे.

जोखीम व्यवस्थापन हे आमच्या व्यवसायातील मूलभूत तत्त्व राहिले आहे. योग्य विक्री, योग्य स्रोत आणि नीटनेटके ऑनबोर्डिंग यावर आमचा भर असतो. याचेच उदाहरण म्हणजे ‘क्यू१-एफवाय२०२६’मध्ये आमचा सॉल्व्हन्सी रेशो २१२.३ टक्के इतका होता. कंपनीच्या स्थापनेपासून आमची एकही मालमत्ता बुडीत निघालेली नाही. ‘क्यू१-एफवाय२०२६’मध्ये आमचा तेराव्या महिन्याचा टिकाव दर ८६ टक्के इतका असून, तो आमच्या व्यवसायाच्या गुणवत्तेचे निदर्शक आहे.

ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, उत्पादन नेतृत्व, व्यापक वितरण नेटवर्क आणि व्यवसाय उत्कृष्टता हे आमचे बळकट पैलू आहेत. आम्ही त्यावर भर देत राहू. या गोष्टींना मनुष्यबळ, डिजिटायझेशन आणि अ‍ॅनालिटिक्स या तीन आधारस्तंभांची साथ असेल. त्यामुळे व्हीएनबीमध्ये भक्कम वाढ करण्यासारखी मुख्य उद्दिष्टपूर्ती साध्य करणे आपल्याला शक्य होईल.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...