पुणे- डॉ.अण्णाभाऊ साठे यांना सरकार भारतरत्न पुरस्कार का नाही देत ? असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला आहे.
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन पुणे शहर यांच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ, अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज दहावी व बारावी मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींचा सत्कार समारंभ व व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते . डॉ श्रीपाल सबनीस यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जिवन चरीत्र्यावर आधारीत खास शैलीमध्ये अण्णा भाऊचा संपूर्ण जिवन प्रवासाचे वर्णन करतांना म्हणाले की अण्णा भाऊचा साहित्य है जगविख्खात साहित्य असुन त्यांच्या शाहिरीचा संपूर्ण जगामध्ये गौरव केला जात आहे म्हणूनच त्यांना जगविख्यात साहितिक शाहिर म्हणून ओळखलं जाते अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा देशाचा सर्व उच्छ नागरिक किताब का नाही दिला जात असा सवाल त्यांनी सरकार ला केला आहे ?
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांचा सत्कार डॉ . श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला.

त्याच बरोबर त नुकत्याच झालेल्या विधी व न्याय विभागाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कु. सबोरी अण्णा लोंढे हिने दंडाधिकारी म्हणून तिने पदवी प्राप्त झाली तिचे त्याचबरोबर काशिवाडी भागातील रहिवाशी, मनपा शाळेत शिकून संपूर्ण शिष्यवृत्ती वर अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेला समाजातील तरुण विद्यार्थी कु.ओम गायकवाड यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्ख संयोजक व संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी यादवराव सोनवणे , साहित्यिक संपत जाधव अँड. एकनाथ सुगावकर दादासाहेब सोनवणे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे स्वागत अध्यक्ष सौ लक्ष्मीताई पवार सचिव दीपक कसबे , मातंग एकता आंदोलन संघटनेचे महिला आघाडीचे अध्यक्षा अँड. राजश्रीअडसूळ, सौ.सुरेखा खंडाळे, विठ्ठल थोरात , अरुण गायकवाड, विठ्ठल गायकवाड , दयानंद अडगळे, रवी आप्पा पाटोळे , सुनिल बावकर, विलास कांबळे उपाध्यक्ष, संघटनेचे शहरातील पदाधिकारी शाखा प्रमुख त्याचबरोबर शहरातील विविध भागातील इयत्ता दहावी आणि बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. राजश्री अडसूळ, यांनी केले तर आभार दयानंद अडागळे यांनी मांडले.

