आरोपीसह काही जखमी पोलीस देखील ससून रुग्णालयात …
आरोपी आणि पोलिसात हाणामारी …?

पुणे- पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये पकडून आणलेल्या अवघ्या २२ वर्षीय सराईत गुन्हेगाराने पोलिसांवरच हल्ला करून पोलीस ठाण्याची तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंढे असं तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याने पोलीस ठाण्यात तोडफोड करत खिडक्यांच्या काचा फोडल्या,कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेत त्याला सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आलं होतं,पोलीस स्टेशन मधील कॉम्प्युटर देखील त्यांनी फोडले
पोलिसांच्या तोंडावर मिरचीचा स्प्रे मारला…
ही घटना गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. गुन्हेगार हा आधीपासूनच गुन्हेगारी जगतात सक्रिया असल्याीच माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडे आक्रमक होत लोंढे याने ४ ते ५ पोलिसांच्या तोंडावर पेपर स्प्रेची फवारणी केली. ज्यामुळे संबंधित पोलिसांना तातडीने वैद्यकीय उपाचारासाठी पाठवण्यात आले. गुन्हेगाराने पोलिसांना घरात घुसून हत्या करण्याचीही धमकी दिल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.रात्रभर चाललेल्या या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यात खळबळ माजली होती. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे. बारक्या लोंढेवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.गुन्हेगाराला अटक केल्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. उलट त्याने थेट पोलीस ठाण्यातच काचा फोडल्या, खुर्च्या फेकल्या आणि आरडओरड करत स्वतःलाच जखमी करण्याचा प्रयत्न केला.

