मुंबई-विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी कालच्या हाणामारीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, काल झालेल्या प्रकारावर आपण इथे आपल्या भावना व वस्तुस्थिती मांडली नाही आणि आम्ही न्यायाची अपेक्षा आपल्याकडून करणार नाही, तर कुणाकडून करायची? काल बोलताना तुम्ही (अध्यक्ष) म्हणाले महाराष्ट्राच्या विधानसभेत नावलौकीक व विधानसभेच्या पावित्र्याविषयी वक्तव्य केले. काल इथे अंतिम आठवडा प्रस्तावानंतर याच सभागृहाच्या लॉबीमध्ये पायऱ्यांच्या आसपास जी घटना घडली, संपूर्ण देशातच नाही तर देशाबाहेरही महाराष्ट्राची बदनामी झाली, अशा प्रकारच्या बातम्या व चर्चा आहेत.विजय वडेट्टीवार यांच्या विचारणे नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी प्रश्नोत्तराच्या तासानंतर निवेदन देणार असल्याची माहिती दिली. कालच्या घटनेकडे बऱ्याच सदस्यांनी याकडे लक्ष वेधले. या संपूर्ण प्रकाराची मी माहिती घेतली. या प्रकरणी पुढील कारवाई काय करणार आहोत, याविषयी मी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहाला अवगत करेन, असे ते म्हणाले.
विधानभवनातील लॉबीत झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर आज आम्ही महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. ते या प्रकरणी न्यायाची मागणी करतील अशी अपेक्षा आहे.असे यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले . तेव्हा आपण दुपारी दीड वाजता निवेदन करू असे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले.

