पुणे- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एकास अटक करुन एकुण ५,८५,०००/- रु. कि.चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ पुणे शहरातील प्रत्येक पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दि.१७/०७/२०२५ रोजी रात्रौ ऑल आऊट कोबिग ऑपरेशन मोहिम राबविण्या बाबत आदेश दिले होते.त्याप्रमाणे कारवाई करणे करीता दि.१७/०७/२०२५ रोजी मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेडे व निलेश बडाख यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील एक पथक तयार करुन त्यांना रेकॉर्डवरील आरोपी व संशयास्पद फिरणारे इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे कारवाई करणेकामी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील रात्रगस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उप-निरीक्षक सिध्देश्वर रायगोंडा, तपास पथकातील पोलीस अंमलदार शेलार, तांगडे, जाधव, किरण तळेकर असे वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शेलार यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, म्हाडा कॉलनी, एसआरए बिल्डींग, वारजे माळवाडी पुणे या ठिकाणी चार ते पाच इसम एका चारचाकी गाडीमध्ये बसुन सदर ठिकाणी चोरी करण्या करीता आलेले आहेत.
मिळालेल्या बातमीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उप-निरीक्षक सिध्देश्वर रायगोडा यांनी पोलीस स्टाफ सोबत बातमीच्या ठिकाणी गेले असता म्हाडा कॉलनी इ बिल्डींग समोरील रोडवर एक बोलेरो गाडी क्र. एमएच ४५ ए ८४५८ ही अंधारामध्ये थांबलेली असल्याचे दिसुन आल्याने वरील स्टाफ सदर गाडी पाशी जात असताना पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने तेथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले एकुण ५ अनोळखी इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागल्याने त्यापैकी एका इसमास पोलीस स्टाफच्या मदतीने शिताफिने पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता हे सोनु कपुरसिंग टाक वय २९ वर्षे रा. तुळजा भवानी वसाहत, बंटर शाळेमागे गाडीतळ, हडपसर, पुणे असे सांगितले. तसेच नमुद इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडुन २,५०,०००/-रू.कि.ची बोलेरो गाडी, ३,२५,०००/-रू. किं.चे चांदीचे दागिणे व १०,०००/-रु. किंमतीचे घरफोडीचे साहीत्य व प्राणघातक हत्यारे असा एकुण ५,८५,०००/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस अंमलदार शेलार यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन इसम नामे सोनु कपुरसिंग टाक व त्याचे गुन्ह्यातील इतर साथिदार यांचे विरुध्द वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३०२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १११, ३१०(४), ३१०(५), ३१० (६), आर्म अॅक्ट ४ (२५), मपोका कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडा टाकायला निघालेल्या टोळीला पोलिसांनी घेरले ,एकाला पकडले अन ४ पळाले
Date:

