मध्यरात्री विधानभवनाच्या परिसरात हायव्होल्टेज राडा
जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले,‘पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे. म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता,पळून जाणार पडळकर चे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर..! सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..!
मुंबई : विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याने आता वेगळच वळण घेतलंय. जितेंद्र आव्हाड यांनी रात्री 2 वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात पोलिसी बळाला जोरदार विरोध केल्याचं पाहायला मिळालं. विधानभवनच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केलं. यावेळी मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली जात आहे. तर मारहाण करणाऱ्या 5 जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.प्रत्यक्ष मारहाण करणाऱ्या पडळकरांच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांना सोडून देत जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पकडून पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी अक्षरक्ष: जितेंद्र आव्हाड यांना बळाचा वापर करत बाजूला केलं. यावेळी सरकार विरोधात निदर्शने आणि या पोलिसांचा निषेध करण्यात आला. सुमारे तासभर सुरू असलेल्या या राड्याने परिसरात एकाच गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.
दरम्यान, या संपूर्ण राड्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून आता या प्रकरणाचे राजकीय पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे. ऐकूणच विधानभवनच्या परिसरात दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली तुंबळ हाणामारी आणि शिवीगाळमुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा ढासळ्याची आता सर्वच स्तरातून टीका होत आहे. तर दुसरीकडे पोलिसांचा कृतीवर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर कडाडून टीका केली आहे.दरम्यान, विधानभवन परिसरात सुमारे तासभर चाललेल्या या राड्यानंतर पोलिसांनी पोलीसी बळाचा वापर करत धरपकड सुरू केली. तर यावेळी आव्हाड हे थेट पोलिसांच्या कार समोर ठिय्या देत होते. यावेळी त्यांनी कार रोखून धरली असता पोलिसांनी अक्षरक्ष: त्यांना फरफटत बाहेर ओढलं. त्यानंतर पोलिसांनी फौज बोलावली आणि कार्यकर्त्यांना व्यस्त ठेवलं. तर दुसरीकडे गपचूप दुसरी गाडी बोलावून कार्यकर्त्याला नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी आमदार आव्हाडांनी हे पाहिलं आणि परत राडा झाला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील हजार होते.
विधिमंडळाचं अधिवेशन आज (18 जुलै) संपणार आहे, त्यापूर्वी आदल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यामध्ये त्यांनी त्यांना नुकताच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी झालेला वाद, त्यानंतर आलेल्या धमक्यांसंदर्भात माहिती दिली. यानंतर थोड्याच वेळात विधानभवनाच्या लॉबीत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. जितेंद्र आव्हाड या घटनेंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात वाद झाला.

