पुणे-आज पुणे महानगरपालिकेला नेपाळ देशातील महापौर आणि पदाधिकारी यांनी भेट दिली. पुणे महानगरपालिकेमध्ये अति.महा.आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. अति.महा.आयुक्त(वि) यांनी पुणे शहराची व पुणे महानगरपालिकेची विस्तृत माहिती सादरीकरणाद्वारे सादर केली. यानंतर उपआयुक्त सामान्य प्रशासन विभाग , उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग , उप आयुक्त मल:निसारण विभाग इ.विभागांनी त्यांचे विभागाचे सादरीकरण करून माहिती देण्यात आली.
या प्रसंगी नरसिंग चैसीर महापौर महाकाली म्युन्सिपालिटी , बिजय सिंह धामी ,महापौर शैल्याशिखर म्युन्सिपालिटी, राम दत्त जोशी ,चेअरपर्सन लेकाम रुरल म्युन्सिपालिटी , .सुरेंद्र बहादूर बिस्त, चीफ एडमिनीस्टेटीव ऑफिसर शैल्यशिखर म्युन्सिपालिटी, श्रीमती गौरी सिंग रावल, महापौर, पटण म्युन्सिपालिटी, .दीपक बहादूर बम, महापौर ,पुर्चौडी म्युन्सिपालिटी,.पुस्कर राज जोशी ,महापौर दशरथ चंद म्युन्सिपालिटी, श्री.भीम बहादूर चंद महापौर ,मेलौली म्युन्सिपालिटी,श्री,दिल्ली राज जोशी ,महापौर अमरगढी, म्युन्सिपालिटी,.भारत बहादूर जोशी ,महापौर परशुराम म्युन्सिपालिटी हे उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने उप आयुक्त जयंत भोसेकर.उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम ,नगरसचिव योगिता भोसले , संगणक प्रोग्रामर राहुल जगताप इ.अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
नेपाळ देशातील महापौरांनी व अधिकाऱ्यांनी दिली पुणे महापालिकेला भेट …
Date:

