Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मधुमेहावर प्रभावी ठरणारे सॅनोफीचे मौखिक औषध उपलब्ध करुन देण्यासाठी एमक्युअरचा पुढाकार

Date:

एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेड आणि सॅनोफी इंडिया लिमिटेडमध्ये करार

मुंबई, 17th जुलै २०२५ : देशात मधुमेही रुग्णांची वाढती संख्या वैद्यकीय क्षेत्रासाठी चिंतेचा विषय बनली असताना एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेड कंपनीने मधुमेहींसाठी तोंडावाटे घेतल्या जाणा-या औषधांची उपलब्धता करुन दिली आहे. एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेड आणि सॅनोफी इंडिया लिमिटेड यांनी सॅनोफीच्या तोंडावाटे घेतल्या जाणा-या मधुमेहाच्या औषधांचा प्रसार वाढवण्यासाठी विशेष वितरण भागीदारीची घोषणा केली. या सहकार्यामुळे सॅनोफीची मधुमेहावर नियंत्रण आणणारी अत्याधुनिक औषधे आता भारतातील मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध झाली आहे. या औषधांमुळे मधुमेहग्रस्त रुग्णांवर प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध होतीलअसा विश्वास एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेडने व्यक्त केला.

मधुमेह नियंत्रणासाठी तोंडावाटे दिल्या जाणा-या औषधाचे वितरण आणि प्रचार एमक्युअर फार्माक्युटिकल्स कंपनीकडून केले जाईल. भारतात अनेक वर्षांपासून वापरल्या जाणा-या Amaryl®  आणि Cetapin® या दोन्ही औषधांचाही सॅनोफीच्या मधुमेह नियंत्रणासाठी उपलब्ध झालेल्या औषधामध्ये समावेश करण्यात आला आहे.

सॅनोफी इंडिया लिमिटेडच्या भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय उत्पादन केंद्रांमध्ये या ब्रँण्डची मालकी आणि उत्पादन पूर्वीप्रमाणेच कायम राहील. आपल्या मजबूत नेटवर्कचा वापर करुन एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेड देशभरातील आरोग्यसेवा व्यावसायिकांशी संपर्क साधेल. या नेटवर्कच्या माध्यमातून मधुमेह नियंत्रणासाठी आवश्यक असलेले तोंडावाटे दिले जाणारे औषध अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवता येईल.

दोन्ही कंपन्यांमधील ही भागीदारी पूर्णतः उत्पादन वितरण आणि प्रचारापुरती मर्यादित असूनकर्मचारी पातळीवर कोणताही बदल केला जाणार नाही.

सॅनोफीचे फार्मा साऊथईस्ट आशिया व इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि एमसीओ लीड एरिक मँशन यांनी या भागीदारीबद्दल कंपनीची भूमिका मांडली. ते म्हणाले, “भारतात १० कोटींपेक्षा जास्त लोकांना मधुमेह टाईप२ ची बाधा झाली आहे. टाईप २ मधुमेहाच्या रुग्णांना अत्यंत गुंतागुतींच्या शारीरीक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. टाईप २ मधुमेहाशी झगडणा-या १० कोटींपेक्षा जास्त रुग्णांच्या शरीरात साखरेचे प्रमाण अनियंत्रित झाले आहे. अशा ६० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना दीर्घकालीन आणि गंभीर स्वरुपातील आरोग्याच्या समस्यांचा धोका संभवतो. मधुमेहीग्रस्त रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा घडवणेत्यांच्या शरीरातील साखरेवर नियंत्रण मिळवून देणे यासाठी सॅनोफी नेहमीच वचनबद्ध आहे. भारतात एमक्युअरचे विस्तृत आणि सखोल नेटवर्क आहे. आमचा विश्वास आहे कीया नेटवर्कमुळे आम्हांला सर्वोत्तम दर्ज्याच्या व आघाडीच्या OADs – Amaryl® आणि Cetapin® या दोन्ही औषधांचा विकास करण्याचे ध्येय यशस्वीपणे गाठता येईल. ही भागीदारी रुग्ण तसेच रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टर्सवर खरोखरच फायदेशीर ठरेल. ”

सॅनोफी कंपनी लिमिटेडसोबत केलेल्या भागीदारीतून आपण रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता यांनी सांगितले. “ रुग्णांना उत्तम दर्ज्याच्या उपचारपद्धती सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे देभशरातील वितरण जाळे मजबूत असल्याने सॅनोफीची मधुमेह नियंत्रित आणणारी मौखिक औषधे गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवली जातील. ही भागीदारी आमच्या मधुमेहासंबंधी धोरणाशी सुसंगत आहे. तोंडावाटे दिले जाणारे मधुमेहविरोधी औषध लाखो लोकांसाठी प्रभावी उपचारपद्धती म्हणून उपलब्ध होणार आहे. देशभरातील मधुमेहग्रस्ती रुग्णांना प्रभावी उपचारपद्धती मिळाल्याने त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जाईल, ” असा विश्वास मेहता यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...