पुणे – राज्य शासनाने पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र शासनाने २०२१ साली पुणे महानगर नियोजन समिती स्थापन केली. पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरातील नागरी पायाभूत सुविधा, नागरी वाहतूक, पर्यावरण, उद्योग याचे नियोजन व्हावे आणि त्याआधारे विकास व्हावा याकरिता समिती स्थापन केलेली आहे.
‘नगरसेवक, पीएमपीएलचे संचालक आणि छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार अशा कामांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला अनुभव आहे. शहराचा विकास होत असताना शहराभोवतीच्या परिसराचाही विकास होण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन’, अशी प्रतिक्रिया आमदार शिरोळे यांनी त्यांच्या नियुक्तीवर व्यक्त केली.

