Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सलमानखान यांच्या हस्ते इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ

Date:

●       आयएसआरएलचा 30 दशलक्ष चाहत्यांचा वर्ग अनेक पटींनी वाढणार

●        सलमान खान आयएसआरएलमध्ये गुंतवणूकदार म्हणून प्रवेश करणारमोटरस्पोर्ट मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी पुढाकार

●        पुणेजवळ आयएसआरएल प्रोव्हिंग ग्राउंड्सचे उद्घाटन – युवा रायडर्सना घडवण्यासाठी आणि वाहन कंपन्यांसाठी वर्षभर चाचणी  प्रमोशनचे व्यासपीठ उपलब्ध

●        आयएसआरएल फॅन पार्क्सची सुरुवात – रेसिंगमनोरंजन आणि ब्रँडशी थेट जोडणाऱ्या कुटुंबकेंद्रित अनुभवाची संकल्पना

●        दुसऱ्या हंगामात 155 आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी नोंदणी केली

मुंबई,  — बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या (आयएसआरएल) दुसऱ्या हंगामाचा भव्य शुभारंभ आज मुंबईत करण्यात आला. आयएसआरएलचे ब्रँड अॅम्बेसिडर असलेले सलमान खान यांची अफाट लोकप्रियता, सर्व वयोगटांमध्ये असणारे अपील आणि मोटरसायकल तसेच फिटनेसबाबतची विशेष आवड यामुळे हा खेळ निवडक चाहत्यांच्या चौकटीपलीकडे जाऊन मुख्य प्रवाहात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मुंबईत झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात सलमान खान यांनी आयएसआरएलमध्ये गुंतवणूकदार म्हणूनही सहभागी होण्याची घोषणा केली. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे आयएसआरएल केवळ मोटरस्पोर्टप्रेमींसाठी नव्हे, तर ऑटोमोटिव्ह ब्रँड्स, ग्राहक-केंद्रित उद्योग आणि कुटुंब-केंद्रित मनोरंजनासाठीही महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. लीगचा मुख्य उद्देश भारतीय तरुणांसाठी मोटरस्पोर्टमध्ये जागतिक दर्जाची संधी उपलब्ध करून देण्याचा आहे.

भारतात सुपरक्रॉसला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याच्या दृष्टीने सलमान खान यांच्या हस्ते ‘आयएसआरएल प्रोव्हिंग ग्राउंड्स’ चा देखील शुभारंभ करण्यात आला. पुणेजवळ 7 एकर परिसरात उभारण्यात येणाऱ्या या अद्ययावत सुविधेत नवोदित रायडर्ससाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विशेष ट्रॅक्सची उभारणी होणार आहे. यामध्ये नवशिक्यांसाठी, मुलांसाठी, मोटोकॉस, सुपरक्रॉस, एटीव्ही, इलेक्ट्रिक बाइक्स आणि ट्रेल रायडिंगसाठी स्वतंत्र ट्रॅक्स असणार आहेत.ॉ

कार्यक्रमात बोलतानासलमान खान म्हणालेमोटरसायकल आणि ऑफरोडिंगबाबत माझी नेहमीच विशेष आवड राहिली आहेआयएसआरएल जे काही तयार करत आहे — जागतिक दर्जाच्या प्रतिभेला एकत्र आणणेदेशांतर्गत खेळाडूंचा पाठिंबा देणेआणि या खेळाभोवती एक संपूर्ण परिसंस्था आणि जीवनशैली उभारणे — हे पाहून मला जाणवले की मी फक्त चेहरा म्हणून नाही तर खऱ्या अर्थाने याचा भाग व्हावेही लीग म्हणजे क्षमता वाढवून पुढे जाण्याचा प्रयत्न आहेआणि तेच माझ्याशी खोलवर जुळते. ‘आयएसआरएल प्रोव्हिंग ग्राउंड्सच्या शुभारंभामुळे भारताच्या युवा पिढीला मोठी स्वप्ने पाहण्याचीआवश्यक पाठिंबासाधने आणि प्रशिक्षक मिळवण्याची संधी मिळणार आहेज्यामुळे ते जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतीलत्याचबरोबरआयएसआरएल जबाबदार राईडिंगला आणि रेसर्स  चाहत्यांच्या सुरक्षेच्या महत्त्वाला समान प्राधान्य देत आहे.”

कार्यक्रमात बोलतानाआयएसआरएलचे व्यवस्थापकीय संचालक वीर पटेल यांनीही पुढे सांगितलेसलमान खान यांचा ब्रँड अॅम्बेसिडर पासून गुंतवणूकदार बनण्याचा प्रवास आयएसआरएलच्या दृष्टीकोनात त्यांचा ठाम विश्वास दर्शवतोयामुळे आमच्या लीगला सांस्कृतिक ताकद आणि मुख्य प्रवाहातील विश्वास यांचा अमूल्य संगम मिळाला आहेजे भारतातील पुढच्या पिढीसाठी एक विश्वासार्ह आणि विस्तारण्यायोग्य व्यवसाय म्हणून आमची ओळख बळकट करतेत्यांच्या सहभागामुळे मोटरस्पोर्टयुवा संलग्नता आणि ब्रँड इनोव्हेशनच्या भविष्यासाठी सुपरक्रॉस तयार असल्याचा स्पष्ट संदेश बाजारात जात आहे.”

आयएसआरएल आता भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी एकमेव समर्पित व्यासपीठ आहे जे अनुभवात्मक वाढीस प्रोत्साहन देते. जगभरातील ग्राहकांशी थेट संवाद साधण्याच्या वाढत्या प्रवाहाला प्रतिसाद देत, आयएसआरएलचा फॉर्मॅट ब्रँड्सना थेट क्रियाशीलता देण्यास अनन्यसाधारण स्थितीत आहे, ज्यामुळे ते उत्साही बायकर्स आणि तरुण प्रेक्षकांशी थेट जोडले जातात.

भारतामध्ये ऑरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEMs) आणि घटक ब्रँड्सना थेट क्रियाशील फॉर्मॅटद्वारे ग्राहकांशी संवाद साधण्याच्या मर्यादित संधी असताना, आयएसआरएल मोटरस्पोर्ट्स, जीवनशैली आणि ऑटो नवोन्मेष यांच्या संगमावर एक विस्तृत, उच्च-सहभागी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन ही महत्त्वाची गरज पूर्ण करत आहे.

आयएसआरएलच्या पुढील 5 वर्षांच्या रोडमॅपमध्ये अनेक शहरांमध्ये वेगाने विस्तार करणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य, जागतिक खेळाडूंचा सहभाग आणि फ्रँचायझी मूल्य, प्रायोजक महसूल व ब्रँड भागीदारींमध्ये महत्त्वपूर्ण वाढ यांचा समावेश आहे.

पुणे, अहमदाबाद आणि बंगलोरसह विविध ठिकाणी चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या आयएसआरएलच्या धडाकेबाज पदार्पण हंगामानंतर, ही वाढ आयएसआरएलच्या भारतातील अग्रगण्य मोटरस्पोर्ट लीग होण्याच्या प्रवासातील एक नवी, धाडसी पर्वणी ठरली आहे. धाडसी दृष्टीकोन, उच्च-प्रोफाइल भागीदारी आणि झपाट्याने वाढणाऱ्या चाहत्यांसह आयएसआरएल भारतातील क्रीडा-मनोरंजन व ऑटोमार्केटिंगच्या नव्या परिमाणांना परिभाषित करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...