पुणे- बावनकुळे यांचा व्हिडिओ आज पत्रकार परिषदेत दाखवत ..बावनकुळे गुन्हेगार असलेल्या दीपक काटेच्या पाठीशी असल्याचाच नव्हे तर ते हल्ल्याचे मास्टर माइंड असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड चे प्रवीण गायकवाड यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून केला . एवढेच नव्हे तर हल्ला सरकार पुरस्कृत आणि भाजपा ने घडवून आणला व CM देवेंद्र फडणवीस देखील यातील गुन्हेगार दीपक काटे यांच्या पाठीशी असल्याचा उल्लेख देखील केला .माझ्यावरील हल्ल्याची बातमी व्हिडिओ सह भाजपच्या PR लोकांनीच व्हायरल केली. पिस्तूल ,गोळ्या घेऊन फिरणारा गुन्हेगाराने हल्ला केला,ज्याला मोका लावायला हवा त्याला जामीन होईल अशी कलमे लाऊन गुन्हा दाखल केला,असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे.
माझ्यावरील हल्ला:मास्टर माइंड बावनकुळे -प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप
Date:

