मुंबई/पुणे (दि १५) : कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी संग्रहालयात मागील मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विषाणूजन्य आजाराने हरणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार हेमंत रासने यांनी हरणांच्या मृत्यूचा मुद्दा विधानसभेत मांडत प्रशासनाने इतर प्राण्यांना धोका होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
“कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय गेली दोन दिवसात 14 हरणांचा अचानक मृत्यू झाला असून अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. साथीच्या रोगामुळे असे झाल्याची शक्यता आहे, त्यामुळे इतर प्राण्यांना त्याचा काही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी तातडीने शासनाने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत” अशी मागणी रासने यांनी केली आहे..
याबद्दल बोलताना हेमंत रासने म्हणाले, “कात्रजच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात १४ हरणांचा मृत्यू ही अतिशय दुर्दैवी व धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा निर्माण झाला आहे. अद्याप पोस्टमार्टम अहवाल न आलेला असला, तरी साथीच्या रोगाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इतर प्राण्यांना धोका होऊ नये, यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. प्रशासनाने दक्षता घ्यावी. प्राणीसंग्रहाल पुणे शहरासह राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असल्याने प्राण्यांची सुरक्षितता महत्वाची आहे.

