
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे गोकुळ सभागृह, सुतारदरा,कोथरूड येथे आयोजन केले होते . माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.विविध शासकीय सोयी सुविधांची माहिती आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे कशी उपलब्ध करवून घ्यावीत याची माहिती देत त्याबाबत प्रत्यक्षात कागदपत्रे आणि सुविधा मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांना विनामुल्य मदत केली .
या उपक्रमा अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ कोथरूड भागातील सुतारदरा,जयभवानी नगर, किष्किंधानगर, शिवतीर्थनगर, म्हातोबा नगर येथील सुमारे ७०० पेक्षा जास्त नागरिकांना करून देण्यात आला. त्यामध्ये आधारकार्ड दुरुस्ती करणे, रेशनकार्ड दुरुस्ती करणे, ज्येष्ठ नागरिक कार्ड, शहरी गरीब कार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर दाखला ही शासकीय कागदपत्रे तसेच राज्य सरकारच्या तरुण,तरुणी, महिलांसाठीच्या विविध योजना यांची माहिती देऊन पूर्तता करण्यात आली.
सदर लोकाभिमुख उपक्रमाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, सौ. तृप्ती शिंदे, सौ. कांता खिलारे यांनी अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले होते.

