बाजारपेठेतील अस्थिरतेने बदलली धोरणे
पुणे, १४ जुलै: इक्विटी मार्केटमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, आर्बिट्रेज फंड्स हे कमी जोखमीच्या गुंतवणूक संधींच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आकर्षक पर्याय ठरत आहेत. कॅश आणि फ्युचर मार्केट्समधील किमतींमधील फरकांचा लाभ घेत हे फंड्स उतारचढावांच्या परिस्थितीत अधिक चांगली कामगिरी करतात आणि इंट्रा-मंथ ट्रेडिंग संधींमध्ये फंड मॅनेजर्सना अधिक जास्त वाव देतात.
टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर श्री शैलेश जैन म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत बाजारपेठेतील अस्थिरतेचे संभाव्य लाभ घेत असतानाच गुंतवणूकदारांना थेट इक्विटी जोखमीपासून वाचवण्यासाठी आर्बिट्रेज फंड्स अतिशय योग्य आहेत. उत्पन्नाचे पारंपरिक मार्ग कमी आकर्षक बनलेले असताना देखील एलिव्हेटेड रोल स्प्रेड आणि सततची अस्थिरता यामुळे आर्बिट्रेज फंड्स वाजवी परतावा देण्यास सक्षम आहेत. इक्विटी टॅक्स रिटर्न शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आर्बिट्रेज फंड एक योग्य प्रस्ताव प्रस्तुत करतात.”
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जून २०२५ दरम्यान आर्बिट्रेज फंड्समध्ये ४३,०७७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली, इतर हायब्रीड आणि इक्विटी विभागांमधील गुंतवणुकीपेक्षा ही गुंतवणूक जास्त होती. अनिश्चितता खूप जास्त वाढलेली असताना, इक्विटी जोखीम कमीत कमी ठेवून तुलनेने जास्त चांगला परतावा देऊ शकतील अशा साधनांकडे गुंतवणूकदार वळत असल्याचे या वाढीतून दिसून येते. पण नफा होईलच याची हमी नाही.
उद्योगक्षेत्रातील व्यापक ट्रेंड्सना अनुसरून टाटा आर्बिट्रेज फंडमध्ये देखील एप्रिल ते जून २०२५ या काळात ५,२१७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली, त्यापैकी ३५६ कोटी रुपये पुण्यातून गुंतवले गेले होते. ३० जून २०२५ रोजी या फंडमध्ये व्यवस्थापनांतर्गत संपत्ती १४,२७४ कोटी रुपये होती.
वातावरण आर्बिट्रेज धोरणांसाठी अनुकूल आहे कारण वाढलेली अस्थिरता आणि मजबूत रोल स्प्रेड्स यांनी संभाव्य परतावा संधी खुल्या केल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हल्लीच्या शिथिलीकरणाच्या उपायांमुळे – रेपो रेट ५० बेसिस पॉईंट्सने आणि कॅश रिझर्व्ह रेशो १०० बेसिस पॉईंट्सने कमी केल्यामुळे – निश्चित उत्पन्न देणाऱ्या पारंपरिक गुंतवणूक मार्गांच्या तुलनेत आर्बिट्रेज फंड्सची आकर्षकता अजून जास्त वाढली आहे. आगामी कॉर्पोरेट उत्पन्न आणि सकारात्मक मान्सून दृष्टिकोन देखील बाजारपेठेतील भावना उत्तेजित करेल अशी अपेक्षा आहे.
जागतिक आणि देशांतर्गत अनिश्चितता बाजारपेठेच्या भविष्यावर परिणाम करत असताना, गुंतवणूकदारांना अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी आर्बिट्रेज फंड हा एक पर्याय आहे. व्याजदर घसरत चालले आहेत आणि बचत खात्यातील परतावा कमी होत आहे, त्यामुळे पारंपारिक निश्चित उत्पन्न पर्यायांची आकर्षकता परताव्यासाठी तुलनेने कमी झाली आहे. त्याच वेळी, अपेक्षित भारत–अमेरिका व्यापार करार, टॅरिफ वाटाघाटी आणि सध्या सुरु असलेले भू–राजकीय तणाव यासारखे घटक बाजारातील अस्थिरता वाढवत आहेत. अमेरिकन डॉलर निर्देशांक सध्या जरी कमी असला तरी, जागतिक जोखीम टाळण्यासाठी कोणत्याही वाढीमुळे बाजारात नवीन चढउतार होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर, आर्बिट्रेज फंड गुंतवणूकदारांना थेट इक्विटी एक्सपोजरशिवाय अस्थिरतेचा फायदा घेण्यासाठी कमी जोखीमचा मार्ग देण्याचा प्रयत्न करतात.
आर्बिट्रेज फंड देखील कर बचत करण्यात सक्षम आहेत, कारण त्यांच्यावर इक्विटी म्युच्युअल फंडाप्रमाणे कर आकारला जातो – ज्यामुळे त्यांना अल्पकालीन कर्ज साधनांवर फायदा मिळतो, विशेषतः जास्त उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांसाठी जे कर भरणा केल्यानंतरचा परतावा ऑप्टिमायझ करू इच्छितात. इक्विटी मार्केट एक्सपोजरमध्ये कमी जोखीम शोधणाऱ्यांसाठी, पारंपारिक बचत पर्यायांच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक परताव्याच्या संभाव्यतेसह, आर्बिट्रेज फंड आजच्या अस्थिर वातावरणात संभाव्य गुंतवणूक संधी सादर करतात.

