रोड टू स्कूल आणि रोड टू लाईव्हलीहुड कार्यक्रमांद्वारे प्रभावी परिवर्तन
भारत सरकारच्या “स्किल्ड इंडिया” दृष्टिकोनाशी आणि युवकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रनिर्माणाशी
सुसंगत प्रयत्न
मुंबई, 15 जुलै, 2025: जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त 110 वर्षांची परंपरा असलेल्या हिंदुजा
समूहाच्या समाजपयोगी उपक्रम शाखा हिंदुजा फाउंडेशनने हिंदुजा ग्रुपमधील कंपन्यांच्या सहकार्याने
राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांद्वारे भारतातील युवकांना परिवर्तनकारी व भविष्यकालीन कौशल्यांनी सुसज्ज
करण्याची आपली बांधिलकी आणखी मजबूत केली आहे. वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल-प्रथम
अर्थव्यवस्थेत शिक्षण व उपजीविकेसाठीच्या कार्यक्रमांतील फाउंडेशनचे निश्चित प्रयत्न भारतीय तरुणांना
आत्मविश्वासाने आणि ध्येयाने यशस्वी होण्यासाठी सक्षम करत आहेत.
हिंदुजा ग्रुपने शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रभाव निर्माण केला आहे.
कौशल्यविकासाच्या आघाडीवर, रोड टू लाईव्हलीहुड (RTL) कार्यक्रम आणि व्यावसायिक प्रशिक्षण,
डिजिटल साक्षरता वाढविणे, संवादकौशल्य व कार्यशक्ती म्हणून तयार करणे अशा विविध उपक्रमांद्वारे
जवळपास 1 लाख युवकांना सक्षम बनवले आहे. शिक्षणाच्या आघाडीवर आर्थिक वर्ष 25 पर्यंत, रोड टू
स्कूल (RTS), रोड टू लाईव्हलीहुड (RTL), हरयाणा डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड आणि इतर गट-
नेतृत्वाखालील शैक्षणिक उपक्रमांद्वारे 15 हून अधिक राज्यांतील 7.4 लाखांहून अधिक युवकांना लाभ
मिळाला आहे. RTS आणि हरियाणा DIB हे मूलभूत शिक्षणावर लक्ष केंद्रित करत असताना, RTL शिक्षण
आणि रोजगार यांच्यामध्ये पूल उभारत आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना हिंदुजा फाउंडेशनच्या स्टीयरिंग कमिटी सदस्य नम्रता हिंदुजा म्हणाल्या,
“हिंदुजा फाउंडेशनमध्ये आम्ही युवक सक्षमीकरणाकडे केवळ एका कार्यक्रमाचे ध्येय म्हणून बघत नाही तर
राष्ट्रनिर्माणाचा मूलाधार मानतो. कौशल्ये, मूल्ये आणि दृष्टीकोनाने परिपूर्ण व्यक्तिमत्त्व तयार करून आपण
एक असा पाया घालत आहोत जिथे प्रत्येक भारतीय तरुण अधिक समावेशक, लवचिक आणि प्रगत
भारतासाठीचा प्रेरक घटक बनेल.”
यावेळी बोलताना हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम म्हणाले, “25 वर्षांखालील 600 दशलक्षांहून
अधिक भारतीय असलेल्या देशात युवक कौशल्यांचा मुद्दा राष्ट्रीय महत्वाचा आहे. हिंदुजा फाउंडेशनमध्ये
आम्हाला विश्वास आहे की खरे सक्षमीकरण म्हणजे तरुणांना भविष्यकालीन डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज
करणे आहे. डिजिटल दरी भरून काढत आणि स्थानिक पातळीवरील नाविन्यपूर्णतेला चालना देत आपण
आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि उद्दिष्टपूर्ण दृष्टीने डिजिटल अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल अशी पिढी निर्माण
करत आहोत. तरुणांना हवामान बदल, संसाधनांचा सजग वापर, सामाजिक विषमता यांसारखे मुद्दे
समजून घेण्यासाठी आणि त्याबाबत अर्थपूर्ण कृती करण्यासाठी मदत करणे हे देखील एक मोठे आव्हान
आहे.”
हे प्रयत्न कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या “स्किल्ड इंडिया” दृष्टिकोनाशी व भारत
सरकारच्या “विकसित भारत” धोरणाशी पूर्णपणे सुसंगत आहेत. यामध्ये फाउंडेशनच्या युवक नेतृत्वाधारित
राष्ट्रनिर्माणाच्या तत्त्वज्ञानाचाही समावेश आहे. डिजिटल साक्षर, सामाजिकदृष्ट्या जागरूक व
भविष्यकालीन कौशल्यांनी सज्ज पिढी तयार करून हिंदुजा फाउंडेशन भारताच्या आत्मनिर्भर व जागतिक
स्तरावर स्पर्धात्मक आणि कार्यक्षम बनण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
आपल्या प्रमुख शैक्षणिक उपक्रमांद्वारे हिंदुजा फाउंडेशनने वंचित समुदायांमध्ये मोठाच परिणाम साधला
आहे. रोड टू स्कूल आणि रोड टू लाईव्हलीहुड कार्यक्रमांनी राष्ट्रीय स्तरावर परिवर्तन घडवून आणले आहे:
- 7,44,300 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच
- 7,965 शाळा याअंतर्गत
- 18,000 शिक्षकांवर परिणाम
- 2,40,000 समुदाय सदस्य सहभागी
- 72% गळती झालेल्या विद्यार्थ्यांचा पुन्हा समावेश
- 15,464 विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमधून सरकारी प्रकल्प शाळांमध्ये आणले
आपल्या निश्चित लक्ष्य ठेऊन केलेल्या कौशल्यविकास उपक्रमांद्वारे हिंदुजा फाउंडेशनने समूहातील
कंपन्यांच्या सहकार्याने वंचित तरुणांना भविष्यकालीन कौशल्यांनी सक्षम केले आहे. त्यामुळे भारतभरात
रोजगारयोग्यता आणि डिजिटल समावेशनात भर पडली आहे.
रोड टू लाईव्हलीहुड (RTL) सह इतर कौशल्य विकास उपक्रमांद्वारे सुमारे 1 लाख युवकांना लाभ
झाला आहे.

