मुंबई, दि. १४ जुलै २०२५ : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात आज हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरविंदर कल्याण यांनी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. या सौजन्य भेटीप्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे देखील उपस्थित होते.
या भेटीत दोन्ही राज्यांच्या संसदीय परंपरा, विधीमंडळातील कामकाज यांसारख्या मुद्द्यांवर सुसंवाद झाला. संसदीय सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण ही लोकशाहीच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या कार्याची हरियाणाचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी प्रशंसा केली.
ही भेट सौहार्द, सन्मान व सहकार्य यांचे प्रतीक ठरली असून, दोन्ही राज्यांतील विधिमंडळांमधील संबंध अधिक दृढ करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

